तुम्हीच लिहा स्वातंत्र्यदिनाचे माझे भाषण! मोदींचे जनतेला ‘हे’ आहे आवाहन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑगस्टपर्यंत NarendraModiApp या नरेंद्र मोदी यांच्या अँप वर किंवा http://MyGov.in या संकेतस्थळावर सूचना पाठवण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यंदाच्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्रता दिनी होणारे भाषण विशेष असणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव आहे. त्या निमित्ताने ते देशाला संबोधित करणार आहेत. मात्र त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनसामान्यांची मुद्दे जाणून घेणार आहेत. त्याआधारे ते या ऐतिहासिक दिवशी भाषण करणार आहेत.

१४ ऑगस्टपर्यंत सूचना पाठवता येणार!

भारतासाठी यंदाचा स्वातंत्र्यदिन हा खास आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झालेली आहेत. या  अमृत महोत्सवाच्या निमित्ताने दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून भाषण करण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाली आहे. या सुवर्णक्षणी पंतप्रधान मोदी भारताला काय संबोधित करणार आहेत, याविषयी देशासह अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनोखा प्रयोग केला आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला राष्ट्राच्या विकासासाठी सूचना करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑगस्टपर्यंत NarendraModiApp या नरेंद्र मोदी यांच्या अँप वर किंवा http://MyGov.in या संकेतस्थळावर सूचना पाठवण्याचे आवाहन केले आहे. जनतेने राष्ट्र निर्माणासाठी त्यांच्या सूचना पाठवाव्यात, असे म्हटले आहे.

(हेही वाचा : आता ‘नाना’ देणार चव्हाण-थोरात समर्थकांना नारळ?)

जनतेच्या सूचनांच्या आधारे पंतप्रधान भूमिका मांडणार!

यंदाच्या वर्षीही देशावर कोरोनाचे संकट कायम आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यासाठीची तयारी असो कि लसीकरणाचा मुद्दा असो. देशात नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. देशभरात विविध राज्यांमध्ये जलप्रलय सुरु आहे. दरडी कोसळत आहे. त्यात शेकडो जणांचे प्राण गेले आहेत. महाराष्ट्र, गुजरातसह दक्षिणेच्या समुद्रकाठी वसलेल्या राज्यांना विशेष परिणामांना सामोरे जावे लागत आहे. त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच देशात सध्या किसान युनियनचे आंदोलन सुरु आहे. त्याला खलिस्तानी दहशतवाद्यांचे समर्थन असल्याने देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा रीतीने विविध समस्यांवर पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर देशाला काय संबोधित करणार आहेत, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी देशातील जनतेला त्यांची मते पाठवण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेची मते जाणून घेऊन त्यांची भूमिका यंदाच्या स्वातंत्र्यदिनी मांडणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here