जगात मोदीच नंबर वन!

152

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा नंबर वन ठरले आहेत. जगातील काही लोकप्रिय नेत्यांमध्ये कायम मोदी अग्रेसर राहिले आहेत. नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी पंतप्रधान मोदी हे चर्चेत असतात. आता माॅर्निंग कन्सल्ट या कंपनीनं केलेल्या सर्व्हेमध्ये पंतप्रधान मोदी हे पुन्हा अव्वल ठरले आहेत. माॅर्निंग कन्सल्टने याबाबत ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

राणेंनी व्यक्त केला आनंद

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत, मोदी नंबर वन ठरल्याने आनंद व्यक्त केला आहे. नारायण राणे म्हणाले की, खरच हा अभिमानाचा क्षण आहे. सध्याच्या काळातील जगातील सर्वात मोठे नेते ठरले आहेत. लोकमान्यता मिळालेल्या नेत्यांमध्ये तब्बल 77 टक्के रेटिंग मिळवून, नरेंद्र मोदी हे नंबर वन ठरले आहेत. पुढे ते असंही म्हणाले की, ‘हे रेटिंग जून 2021 मधील 66 टक्क्यांवरून नोव्हेंबर 2021 मध्ये 70 टक्क्यांवर गेलं आणि त्यानंतर आता 77 टक्के वर आहे. यामुळे ही अभूतपूर्व वाढ आहे’ असंही राणे म्हणाले.

‘या’ नेत्यांना मागे टाकत मोदी ठरले अव्वल

ही नवीन आकडेवारी 18 मार्च रोजी प्रसिद्ध झाली आहे. या सर्वेक्षणात 13 जागतिक नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. पीएम मोदींनंतर मेक्सिकोचे अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर दुसऱ्या क्रमांकावर आहेत, ज्यांचे अप्रूव्हल रेटिंग 63 टक्के आहे. इटलीच्या मारिया द्राघीला 54 आणि जपानच्या फुमियो किशिदाला 45 टक्के मंजूरी रेटिंग मिळाली.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.