PM Narendra Modi यांनी मांडली विकासाची ब्ल्यू-प्रिंट; पाच वर्षांचा रोडमॅप तयार

76

सध्या आपला देश जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. आम्हाला तिसऱ्यांदा जनादेश मिळाला आहे. आता तिसऱ्या टर्ममध्ये ही अर्थव्यवस्था आम्ही तिसऱ्या क्रमांकावर पोहोचवणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, ३ जुलै रोजी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनादरम्यान बोलताना केली. त्यावेळी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी पुढील पाच वर्षाचा रोडमॅप सांगितला.

अर्थव्यवस्थेवर पंतप्रधान मोदींचे भाषण

संसदेत पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi)  म्हणाले की, भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा आमचा संकल्प असून टॉप-३ इकॉनॉमी बनण्याचे टार्गेट आहे. याशिवाय त्यांनी म्हटले की, पुढील पाच वर्षे गरिबीविरुद्धच्या लढाईत निर्णायक ठरतील. जगातील सर्वोच्च अर्थव्यवस्थांच्या यादीत भारतीय इकॉनॉमीला दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर नेण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. पण शीर्षस्थानी पोहोचल्यानंतर आव्हाने वाढतात मात्र करोना आणि सर्व जागतिक तणावाच्या स्थितीतही आम्ही या टप्प्यावर पोहोचण्यात यशस्वी झालो आहोत. यानंतर देशाच्या जनतेने अर्थव्यवस्थेला पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा जनादेश दिला आहे. आम्हाला मिळालेल्या जनादेशामुळे आम्ही जगातील टॉप-३ अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश करू.

(हेही वाचा Hathras Stampede : हाथरस चेंगराचेंगरीतील मृतकांचा आकडा १२१ वर; भोलेबाबाचे नाव एफआयआरमधून वगळले)

गरिबीविरुद्ध लढा सुरूच राहील

आगामी पाच वर्षे गरिबीविरुद्ध निर्णायक लढा देणारी असतील. माझा विश्वास आहे, एक गरीब जेव्हा ताकदीने गरिबीविरुद्ध उभे राहतात तेव्हाच लढा यशस्वी होतो. मागील दहा वर्षाच्या अनुभवाच्या आधारे मी म्हणू शकतो की गरिबीविरुद्धच्या लढाईत आपला देश यशस्वी होईल. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) पुढे म्हटले की या कार्यकाळात नवीन स्टार्टअप आणि नवीन कंपन्यांचा विस्तार होईल. याशिवाय सार्वजनिक वाहतुकीत झपाट्याने बदल होणार असून भारतातील अधिकाधिक लोकांना लाभ मिळावा यासाठी आम्ही गांभीर्याने वाटचाल करत आहोत.

शेतकरी कल्याण

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘सबका साथ सबका विकास’ आमचा मूळ मंत्र आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी काम केले असून लहान शेतकऱ्यांना सतत लाभ मिळत आहे. त्यांनी म्हटले की, किसान क्रेडिट कार्डच्या विस्तारामुळे आम्ही शेतकरी कल्याण व्यापक स्वरूपात पाहिले. तसेच विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकाळात केवळ शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम करण्यात आले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.