स्वच्छता, जलसंधारण, कृषी, अंतराळ, ईशान्य भारतातील राज्ये, महिला शक्ती व योग, आयुर्वेद सारख्या अनेक विषयावर ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियासोबत संवाद साधला. त्याच संवादाचे रूपांतर सुंदर अशा कलाकृतीमध्ये करण्यात आले आहे.
समाविष्ट करण्यात आलेल्या विविध विषयांशी संबंधित चित्रे व कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टला भेट दिली. येथील जनशक्ती प्रदर्शनात त्यांनी कलाकारांनी तयार केलेल्या विविध कलाकृती पाहून त्यांच्या कलेचे कौतुक केले.
(हेही वाचा Rahul Narvekar : आमदारांच्या अपात्रतेवर कधी निर्णय घेणार; विधानसभा अध्यक्षांनी सविस्तर सांगितले)
पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 100व्या भागानिमित्त आर्ट गॅलरीमध्ये ‘जनशक्ती’ नामक हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ते विख्यात क्युरेटर अलका पांडे यांनी आयोजित केले होते. या प्रदर्शनातील कलाकृती तयार करण्यासाठी कलाकारांनी छायाचित्रे, शिल्पे, छायाचित्रण व नवीन माध्यमांचा वापर केला.
प्रदर्शनात स्वच्छता, जलसंधारण, कृषी, अंतराळ, ईशान्य भारतातील राज्ये, महिला शक्ती व योग, आयुर्वेद सारख्या मन की बातमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या विविध विषयांशी संबंधित चित्रे व कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. जनशक्तीसाठी योगदान देणाऱ्या कलाकारांमध्ये मनू व माधवी पारेख, अतुल डोडिया, परेश मैती, इराण्णा जीआर, जगन्नाथ पांडा व इतरांचा समावेश आहे. या प्रदर्शनातील कलाकृती तयार करण्यासाठी कलाकारांनी छायाचित्रे, शिल्पे, छायाचित्रण व नवीन माध्यमांचा वापर केला. शेवटी, पंतप्रधानांनी जनशक्ती प्रदर्शनाच्या कॅटलॉगवर स्वाक्षरी केली. तसेच ‘मन मंदिराचा प्रवास सुखकर होवो’ असा संदेश लिहिला. या कॅटलॉगवर 13 कलाकारांचीही स्वाक्षरी आहे.
Join Our WhatsApp Community