PM Narendra Modi : आजच्या अस्थिर, अशांत आणि संक्रमणाच्या युगात लोकशाहीसमोर अनेक आव्हाने

पंतप्रधान मोदींनी जागतिक लोकशाहीत भारताचे योगदान दाखवणारी उदाहरणे आपल्या भाषणात सांगितली. यात, महिला लोकप्रतिनिधीत्व वाढवण्यासाठी केलेल्या कायदेशीर तरतुदी, दारिद्र निर्मूलनाचे प्रयत्न आणि कोविड महामारीच्या काळात केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचा उल्लेख केला.

167
Lok Sabha Election 2024: 'तुमचे मत म्हणजे तुमचा आवाज', मोदींनी केलं युवा आणि महिलांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन

भारतात लोकशाहीची प्राचीन परंपरा आहे. लोकशाही भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. आजच्या अस्थिर, अशांत आणि संक्रमणाच्या युगात लोकशाहीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यासाठी आपण एकत्र काम करणे आवश्यक आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. या प्रयत्नात भारत सर्व सहकारी लोकशाही देशांशी आपल्या अनुभवांची देवघेव करण्यास सदैव तयार असल्याचेही ते म्हणाले.

(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : मुंबईत काँग्रेसला फक्त एकच जागा, उबाठा शिवसेना लढणार पाच जागा?)

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी (२० मार्च) दूरदृश्य प्रणालीद्वारे ‘लोकशाहीसाठी शिखर परिषदे’ला संबोधित केले. जगभरातल्या लोकशाही राष्ट्रांना आपापल्या अनुभवांचे आदानप्रदान करण्यासाठी आणि परस्परांकडून शिकण्यासाठी, ही शिखर परिषद अतिशय महत्वाचे व्यासपीठ आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. भारतात खोलवर रुजलेल्या लोकशाहीच्या प्रतिबद्धतेला त्यांनी अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले, “एखाद्या विषयावर सर्वसहमती निर्माण करणे, मुक्त संवाद आणि मुक्त चर्चा, भारताच्या इतिहासात सदैव प्रतिबिंबित झाल्या आहेत. आणि म्हणूनच, आम्ही सगळे नागरिक, भारताला ‘लोकशाहीची जननी’ असे म्हणतो.” (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Supreme Court : मोफत ‘भेटवस्तू’ देण्याच्या आश्वासनांबाबत सर्वोच्च न्यायालयाची कडक भूमिका)

लोकशाही लोकांना सक्षम करते :

आज भारत केवळ १४० कोटी लोकांच्या आशा आकांक्षाच पूर्ण करत नाही, तर, संपूर्ण जगाला एक आशा ही दाखवत आहे, की लोकशाहीतही कार्यसिद्धी होते, लोकशाही लोकांना सक्षम करते. यावेळी पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) जागतिक लोकशाहीत भारताचे योगदान दाखवणारी उदाहरणे आपल्या भाषणात सांगितली. यात, महिला लोकप्रतिनिधीत्व वाढवण्यासाठी केलेल्या कायदेशीर तरतुदी, दारिद्र निर्मूलनाचे प्रयत्न आणि कोविड महामारीच्या काळात केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचा उल्लेख केला.

(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्र काँग्रेसकडून ‘या’ १२ उमेदवारांची घोषणा)

लोकशाही राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न :

जगभरातील लोकशाही देशांना भेडसावणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी लोकशाही राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि संस्थांमध्ये सर्वसमावेशकता, निष्पक्षता आणि सहभागात्मक निर्णयप्रक्रिया असावी, यावर त्यांनी (PM Narendra Modi) भर दिला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.