पंतप्रधानांचे ‘ते’ वक्तव्य खोटे ठरवण्याचा काँग्रेसचा केविलवाणा प्रयत्न; FACT CHECK मधून पर्दाफाश

166

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी त्यांनी १९९२ साली त्यांच्या काश्मीर दौऱ्याची आठवण सांगितली. दहशतवाद्यांनी धमकावूनही मोदी २६ जानेवारी १९९२ मध्ये काश्मिरातील लाल चौकात आले आणि तिरंगा फडकावला. त्यांचे हे वक्तव्य खोटे असल्याचे काँग्रेसच्या प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी केले, त्यामुळे पुन्हा जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र सुप्रिया श्रीनेत यांचा मोदी यांचे वक्तव्य खोटे ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, असे दिसून आले आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी? 

१९९२ साली काश्मिरातील लाल चौकात तिरंगा फडकावण्याची कोण हिंमत करणार आहे? कुणी आईचे दूध प्यायले असेल तर येईल, असे दहशतवाद्यांनी आव्हान दिले होते. त्यावेळी आपण स्वतः दशतवाद्यांना उलटे आव्हान दिले होते. आपण स्वतः २६ जानेवारी रोजी लाल चौकात विनासुरक्षा, विना बुलेटीफ्रुफ जाकीट घालून येईल आणि तिरंगा फडकवेल, असे म्हटले होते. त्यानुसार आपण गेलो.

(हेही वाचा काँग्रेसने निवडून आलेली ९० सरकारे पाडली; पंतप्रधानांचा घणाघात)

काय म्हटले काँग्रेसच्या श्रीनेत? 

काँग्रेसच्या प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी दावा केला की, नरेंद्र मोदी जम्मूपासून श्रीनगरपर्यंत बसमध्ये खाली लपून गेले होते. मोदी यांनी सांगितलेली आठवण खोटी आहे, असे म्हटले आहे.

काय म्हणतात सोशल मीडियात? 

यावर टाइम्स नाऊ नवभारत यांनी १९९२ च्या वेळी नरेंद्र मोदी श्रीनगर येथे लाल चौकात नक्की कसे आले, याची माहिती घेतली, त्यासाठी पाकिस्तान येथील वृत्तवाहिनी पीटीव्ही यांचीही बातमी पाहिली. त्यावेळी नरेंद्र मोदी हे जम्मू येथून श्रीनगर येथे बसनेच जाणार होते, तेव्हा त्याच्या सोबत तितकी सुरक्षा नव्हती, मात्र पोलिसांनी त्यांना अडवले, कारण तिथे भूस्खलन होत आहे, म्हणून हेलिकॉप्टरने त्यांनी श्रीनगर येथे जावे अशी विनंती केली होती. तरीही मोदी मान्य करत नव्हते, अखेर पोलिसांच्या विनंतीला मान देऊन ते हवाई मार्गे श्रीनगर येथे गेले. असे असताना काँग्रेसच्या प्रवक्त्या श्रीनेत यांनी मोदी तेव्हा बसमधून खाली लपून श्रीनगर येथे गेले, हा शोध कुठून लावला, असा सवाल टाइम्स नाऊ नवभारत यांनी विचारला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.