संभाजी राजे हे महाराष्ट्रासाठी सन्माननीय आहेत. ते छत्रपतींचे वंशज आहेत. त्यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांची भेट घेतली. त्यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेत्यांचा समावेश आहे, मात्र त्यांची प्रमुख भेट ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झाली पाहिजे होती, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले.
हुकमाची पाने पंतप्रधानांकडे!
मराठा आरक्षणाचा विषय आता केंद्राच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जावे. त्यामध्ये मग भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस असा कुणी भेदभाव करत नाही. सर्वजण राजेंच्या भूमिकेला समर्थन देतात. आता त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच निर्णय घ्यावा, कारण मराठा आरक्षणासाठी हुकमाची पाने ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
(हेही वाचा : …तर 7 जूनपासून रायगडावरुन आंदोलन करू! संभाजी राजे छत्रपतींची घोषणा )
लक्षद्वीपमधील असंतोष देशात पसरेल!
अंदमान, लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांमध्ये शांतता राखणे गरजेचे आहे. त्याठिकाणी अशांतता, धार्मिक उन्माद निर्माण झाल्यास त्याचे देशभर पडसाद उमटतात. लक्षद्वीप येथे प्रशासक म्हणून नेमलेले प्रफुल्ल पटेल यांनी गोमांस बंदीचा निर्णय घेऊन त्या भागात अशांतता निर्माण केली आहे. गोवा, केरळ तसेच अन्य राज्यांमध्येही गोमांस बंदी नाही, मग लक्षद्वीपमध्येच का करावी, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.
Join Our WhatsApp Community