नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. १९ ऑक्टोबर रोजी ‘कर्मयोगी सप्ताह’ – राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा प्रारंभ केला. या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मिशन कर्मयोगीच्या यशावर भाष्य केले आणि सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांनी अभिनव विचार, लोकाभिमुख दृष्टीकोनावर आपले विचार मांडले.
यावेळी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi)म्हणाले की, मिशन कर्मयोगीच्या माध्यमातून सक्रीय मनुष्यबळ निर्माण करणे हे आपले ध्येय आहे, जे आपल्या देशाच्या विकासाची प्रेरक शक्ती बनेल. त्यामुळे आपण जर याच उत्साहाने काम करत राहिलो तर देशाला प्रगत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. राष्ट्रीय शिक्षण सप्ताहादरम्यान शिकलेल्या नवीन गोष्टी आणि अनुभव हे आपल्या लोकांना बळ देतील आणि कार्यप्रणाली सुधारण्यास मदत करतील, ज्यामुळे २०४७ सालापर्यंत विकसित भारताचे आपले ध्येय साध्य करण्यास मदत होईल, असे ही त्यांनी अधोरेखित केले. तसेच त्यांनी गेल्या १० वर्षात घेतलेल्या लोकाभिमुख निर्णायांबाबत चर्चा केली. लोकाभिमुख निर्णयांमुळे त्याचबरोबर मिशन कर्मयोगीसारख्या उपक्रमांच्या प्रभावामुळे हे शक्य झाले आहे, असे ही ते म्हणाले. (PM Narendra Modi)
आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते ऍस्पिरेशनल इंडिया पर्यंतचा प्रवास
कृत्रिम बुद्धिमत्तेकडे जग संधी म्हणून पाहत असले तरी भारतासाठी मात्र, आव्हाने आणि संधी दोन्ही निर्माण होत आहेत. यावर पंतप्रधानांनी सविस्तर भाष्य केले. पंतप्रधानांनी (PM Narendra Modi)दोन प्रकारच्या एआय तंत्रज्ञानांचा उल्लेख केला. ते म्हणाले, एक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता ) आणि दुसरे ऍस्पिरेशनल इंडिया. दोन्हींमध्ये समतोल साधने आवश्यक असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. भारताच्या प्रगतीसाठी आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्यपद्धतीने वापर करायला हवा, असे ही (PM Narendra Modi)त्यांनी सांगितले.
मिशन कर्मयोगी म्हणजे काय?
मिशन कर्मयोगी सप्टेंबर २०२० मध्ये सुरु करण्यात आले. जागतिक दृष्टीकोनासह भारतीय नीतिमूल्यांमध्ये रुजलेल्या आणि भविष्यातील आव्हानांना सज्ज असलेली नागरी सेवा निर्माण व्हावी ही यामागची कल्पना होती. राष्ट्रीय शिक्षण सप्ताह, नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना वैयक्तिक आणि संस्थात्मक क्षमता विकासासाठी ही मोहिम नवी प्रेरणा देईल, असे या योजनेच्या सुरुवातीनंतर अनेकांनी सांगितले आहे. (PM Narendra Modi)
Join Our WhatsApp Community