फाळणीदरम्यान प्राण गमावलेल्यांना पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

133

भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर तसेच 14 ऑगस्ट फाळणीच्या स्मृतिदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘विभाजन विभीषिका स्मृति दिवस’ म्हणून फाळणीच्या वेळी ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 ऑगस्ट हा फाळणी दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. देशाची फाळणी कशी भयावह ठरली आणि त्याचा परिणाम आजही दिसून येतो.

ट्विटद्वारे मोदींनी वाहली श्रद्धांजली

14 ऑगस्ट रोजी भाजप देशभरात फाळणी दिवस पाळत आहे. फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस म्हणून हा दिवस पाळण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती. ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान मोदी यांनी फाळणीच्या वेळी ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘आज, फाळणी स्मृती दिनानिमित्त, मी फाळणीच्या वेळी ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या इतिहासाच्या त्या दुःखद काळात सहन केलेल्या सर्वांच्या सहनशीलतेचे आणि चिकाटीचे कौतुक करतो.’, अशा आशयाचे ट्वीट मोदींनी केले आहे.

(हेही वाचा – ‘हर घर तिरंगा’ अभियानावरून Twitter वॉर! उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाला भाजपाकडून चोख प्रत्युत्तर)

केंद्र सरकारद्वारे मागील वर्षी 14 ऑगस्ट हा दिवस ‘ विभाजन विभीषिका स्मृति दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात 14 ऑगस्ट- फाळणी दिन हा “विभाजन विभीषिका स्मृति दिवस” म्हणून पाळला जाणार आहे. त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. देशाच्या फाळणीच्या वेळेस हिंसा आणि आणि द्वेष यांच्या छायेत विस्थापित झालेल्या आपल्या असंख्य बंधू-भगिनींचा त्याग, संघर्ष आणि बलिदान यांच्या स्मरणार्थ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट हा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.