भारतीय जनता पक्षाचे (BJP) सर्वोच्च नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पक्षाच्या ४४ व्या स्थापना दिनानिमित्त देशभरातील कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजप (BJP) हा देशाचा सर्वात आवडता पक्ष असल्याचं पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) म्हटलं आहे. पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) ट्विट करत लिहिले की, “@BJP4India च्या त्या सर्व महान व्यक्तिमत्त्वांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा आजचा दिवस आहे ज्यांनी अनेक वर्षांच्या मेहनतीने, संघर्षाने आणि बलिदानाने पक्षाला या उंचीवर नेले आहे. आज मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की भाजप (BJP) हा देशातील सर्वात आवडता पक्ष आहे, जो ‘नेशन फर्स्ट’ (Nation First) हा मंत्र घेऊन जनतेची सेवा करण्यात मग्न आहे.” (PM Narendra Modi)
भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस पर देशभर के मेरे कर्मठ और परिश्रमी कार्यकर्ताओं को बहुत-बहुत बधाई और शुभकामनाएं। आज @BJP4India की उन सभी महान विभूतियों को नमन करने का दिन है, जिन्होंने वर्षों की अपनी कड़ी मेहनत, संघर्ष और त्याग से पार्टी को सींचकर इस ऊंचाई तक पहुंचाया है। मैं…
— Narendra Modi (@narendramodi) April 6, 2024
(हेही वाचा – Earthquake: जम्मू काश्मीर आणि राजस्थानात जाणवले भूकंपाचे धक्के)
त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आम्हाला एनडीएचा अविभाज्य भाग असल्याचा अभिमान आहे, कारण ही आघाडी देशाची प्रगती आणि प्रादेशिक आकांक्षा सोबत घेऊन भारताला पुढे नेण्यात विश्वास ठेवते. एनडीए (NDA) ही देशाच्या विविधतेच्या सुंदर रंगांनी सजलेली आघाडी आहे. आमची ही भागीदारी खूप महत्त्वाची आहे आणि मला खात्री आहे की आमची युती आगामी काळात आणखी मजबूत होईल.” (PM Narendra Modi)
(हेही वाचा – Google New Feature: आता फोन कॉल्सद्वारे होणाऱ्या फसवणुकीला बसणार आळा, गुगल देणार लवकरच नवीन फिचर)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लिहिले आहे की, “देशातील जनता नवीन लोकसभा निवडण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मला विश्वास आहे की देशभरातील माझे कुटुंबीय आम्हाला आणखी एका कार्यकाळासाठी आशीर्वाद देतील, जेणेकरून गेल्या दशकात विकसित भारतासाठी जो पाया बांधला गेला आहे त्याला नवीन बळ मिळू शकेल. सरकार आणि जनता यांच्यातील विकासाचा सर्वात मजबूत दुवा असलेल्या भाजप (BJP) आणि एनडीएच्या (NDA) आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मी पुन्हा एकदा माझ्या शुभेच्छा देतो.” असे म्हणत पंतप्रधानांनी देशभरातील कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (PM Narendra Modi)
हे पहा –
Join Our WhatsApp Community