ऐन लोकसभा निवडणुकीत इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी केलेल्या वक्तव्याने काँग्रेससमोरील अडचणी वाढवल्या आहेत. एका मुलाखतीत पित्रोदा यांनी भारताच्या वेगवेगळ्या भागातले लोक कसे दिसतात? याची परदेशी लोकांबरोबर तुलना केली आहे. “भारत विविधतेने भरलेला देश आहे, जिथे पूर्वेकडचे लोक चिनी लोकांसारखे वाटतात. पश्चिमेकडचे लोक अरबी वाटतात. उत्तरेकडचे लोक थोडे युरोपियन्ससारखे वाटतात. दक्षिणेकडचे लोक आफ्रिकीसारखे दिसतात.” असं सॅम पित्रोदा (Sam Pitroda) म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरपूस समाचार घेतला आहे. (PM Narendra Modi)
मला राग आलाय
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)तेलंगणच्या वारंगल येथे एका निवडणूक प्रचारसभेला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले, “आज मी भरपूर रागात आहे. मला शिवी दिली असती, मी सहन केलं असतं. पण शहजादे म्हणजे राहुल गांधीच्या सल्लागाराने जे म्हटलं, त्याने मला राग आलाय. हा माझ्या देशातील लोकांच्या कातडीच्या रंगाचा अपमान आहे.” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पित्रोदाच्या (Sam Pitroda) विधानाचा समाचार घेतला आहे. (PM Narendra Modi)
आम्ही श्रीकृष्णाची पूजा करणारे लोक आहोत
पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi)म्हणाले, “शहजादे म्हणजे राहुल गांधीचे गाइड अंकल म्हणाले की, ज्यांचा चेहरा काळा आहे, ते आफ्रिकेचे आहेत. वर्णाच्या आधारावर इतकी मोठी शिवी दिलीय. कातडीच्या रंगावरुन ठरवलं की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आफ्रिकी आहेत. यांचे विचार आज समजलेत. अरे कातडीचा रंग काहीही असो, आम्ही श्रीकृष्णाची पूजा करणारे लोक आहोत. राहुल गांधींना (Rahul Gandhi) उत्तर द्यावं लागेल. चामडीच्या रंगावरुन देशाचा आणि नागरिकांचा अपमान देशवासी सहन करणार नाहीत. मोदी तर हे सहन करणारच नाही. तुम्हाला उत्तर द्याव लागेल.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (PM Narendra Modi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community