पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi’s visit to Shirdi) आज म्हणजेच गुरुवार २६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते ७५०० कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन तसेच ८६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अंतर्गत लाभ देतील व निळवंडे धरणाचे जलपूजन करुन कालव्याचे जाळे देशाला समर्पित करतील.
पाच वर्षांनंतर साईंचे दर्शन घेणार पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi’s visit to Shirdi) यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००८ साली आणि देशाचे पंतप्रधान झाल्यावर २०१८ साली शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आज पाच वर्षांनी तिसऱ्यांदा ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होणार आहेत.
(हेही वाचा – Deepak Kesarkar : पालकमंत्री म्हणतात बॅनर,फलक लावणे अपरिहार्यच, मुंबई विद्रुप करण्याचं असं केलं समर्थन)
२०१८ मध्ये साईबाबांच्या समाधीचं शताब्दी वर्ष होतं. या सोहळ्याची सांगता नरेंद्र मोदी (PM Narendra Modi’s visit to Shirdi) यांच्या उपस्थितीत झाली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वातावरणकुलीत दर्शन रांग आणि शैक्षणिक संकुलाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. आज पाच वर्षांनी वातानुकूलित दर्शन रांगेचं लोकार्पण करण्यासाठी नरेंद्र मोदी शिर्डीत दाखल होणार आहेत.
असा असे मोदींचा शिर्डी दौरा
दुपारी एकच्या सुमारास नरेंद्र मोदी (PM Narendra Modi’s visit to Shirdi) साई मंदिरात पोहोचतील. साई मंदिरात पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाद्य पूजा करण्यात येईल. त्याचबरोबर आरतीसुद्धा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. यानंतर साईबाबा संस्थानच्या २०२४ च्या डायरीचा प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. यावेळी अर्ध्या तासासाठी साई मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community