PM Narendra Modi: महिलांवरील अत्याचार प्रकरणी पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे निर्देश; नेमकं काय म्हणाले?

150
भारताने ९ वर्षे आधीच 'हे' उद्दिष्ट केले पूर्ण; PM Modi यांनी हरित हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित

बदलापूर, कोलकाता, पुणे प्रकरणांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे. देशभरात महिला अत्याचारांवर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. महिला अत्याचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाष्य केले आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार महिलांच्या सोबत आहे. राज्याच्या सोबत आहे. अत्याचार करणारी मानसिकता आपल्याला दूर करायची आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौऱ्यावर असताना म्हणाले आहेत.

नेपाळ बस दुर्घटनेतील पीडित कुटुंबियांना पूर्ण मदत मिळणार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “महाराष्ट्रातील माझ्या बंधू भगिनींना जय श्रीकृष्ण. उद्या श्रीकृष्ण जयंती आहे मी तुम्हाला आजचं शुभेच्छा देतो.” असे मराठीत म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते पुढे म्हणाले की, नेपाळ बस दुर्घटनेत आपण जळगावातील अनेक सहकाऱ्यांना गमावले. जेव्हा ही घटना घडली भारत सरकारने त्वरित नेपाळ सरकारचे संपर्क साधला. आपण मंत्री रक्षा खडसे यांना त्वरित नेपाळला जाण्यास सांगितले. दुर्घटनेत मृत पावलेल्या लोकांचे मृतदेह आपण विशेष विमानाने परत आणले. जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पीडित कुटुंबियांना केंद्र आणि राज्य सरकारकडून पूर्ण मदत मिळणार आहे. (PM Narendra Modi)

“आज लखपती दीदीचे हे महासंमेलन पार पडत आहे. माझ्या सर्व लाडक्या बहिणी येथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज इथून देशभरातून लाखो बहिणींसाठी सहा हजार करोड रुपयांची राशी जारी करण्यात आली आहे. लाखो बचत गटांनी जोडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील बहिणींना सुद्धा कोट्यावधी रुपयांची मदत मिळाली आहे. या पैशांनी लाखो बहिणींना लखपती दीदी बनण्यासाठी मदत मिळणार आहे. माझ्या सर्व माता आणि भगिनींना शुभेच्छा.” (PM Narendra Modi)

ई एफआयआर काय आहे?

महिलांवरील अत्याचारावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “महिलांवरील होणारे अत्याचार अक्षम्य पाप आहे. दोषी कोणीही असेल त्याला सोडू नका, त्याला कोणत्याही प्रकारे मदत करणारे वाचले नाही पाहिजे. रुग्णालय, शाळा, पोलीस व्यवस्था, कोणत्याही ठिकाणी निष्काळजीपणा होत असेल तर हिशोब करा. वरपर्यंत मेसेज जाऊ द्या. हे पाप अक्षम्य आहे. सरकार येईल जाईल,. पण जीवनाची रक्षा, नारीची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. सर्व राज्य सरकारांना सांगतो, आणि राजकीय पक्षांना सांगतो. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शिक्षा देण्यासाठी आमचं सरकार कायदा कडक करत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने महिला आल्या आहेत. आधी तक्रार येत होती, वेळेत एफआयआर होत नाही. सुनावणी होत नाही. खटला उशीरा सुरू होतो. निर्णय उशिरा येतो. या अडचणी भारतीय न्याय संहितेतून दूर केला आहे. एक चॅप्टर महिला आणि बाल अत्याचाराचा आहे. पीडित महिलांना पोलीस ठाण्यात जायचं नसेल तर ई एफआयआर करू शकते. ई एफआयआरमध्ये कोणी छेडछाड करणार नाही याचीही व्यवस्था केली आहे. त्यामुळे चौकशी चांगली होईल आणि दोषींवर शिक्षा करण्यास मदत होईल.” (PM Narendra Modi)

नव्या कायद्यात फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद

“नव्या कायद्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक शोषणावर फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद केली आहे. लग्नाच्या नावाने मुलींची फसवणूक केली जायची. त्यावर शिक्षा होत नव्हती. आता यावर आम्ही कायदे केले आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार महिलांच्या सोबत आहे. राज्याच्या सोबत आहे. अत्याचार करणारी मानसिकता आपल्याला दूर करायची आहे. भारत विकसित होत आहे. त्यात महाराष्ट्राची मोठी भूमिका आहे. महााराष्ट्र विकसित भारताचा चमकता तारा आहे. गुंतवणूकदारांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. महाराष्ट्राचं भवितव्य सर्वाधिक गुंतवणुकीत आहे. महायुतीचं सरकार म्हणजे गुंतवणूक आणि नोकरीची गॅरंटी आहे.” असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले. (PM Narendra Modi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.