‘मेक इन इंडिया’पाठोपाठ Wed In India देणार पर्यटनाच्या अर्थव्यवस्थेला बळ; पंतप्रधानांनी दिला तरुणांना सल्ला

120
'मेक इन इंडिया'पाठोपाठ Wed In India देणार पर्यटनाच्या अर्थव्यवस्थेला बळ; पंतप्रधानांनी दिला तरुणांना सल्ला
'मेक इन इंडिया'पाठोपाठ Wed In India देणार पर्यटनाच्या अर्थव्यवस्थेला बळ; पंतप्रधानांनी दिला तरुणांना सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दि. ९ ते ११ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट’चे (Rising Rajasthan Global Investment Summit) जयपूरमध्ये उद्घाटन केले. या समिटचा उद्देश राजस्थानमधील गुंतवणूक वाढीस चालणे देणे हा असून या समिटमध्ये अनेक देशांचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय संघटना देखील सहभागी झाल्या आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘वेड इन इंडिया’ (Wed In India) चा राज्यातील पर्यटन वाढण्यास फायदा होईल. तसेच अर्थव्यवस्थेलाही बळ मिळेल.

( हेही वाचा : पक्षनिष्ठा सिद्ध करण्यासाठी Shiv Sena UBT च्या कार्यकर्त्यांची दर्ग्यात शपथ; राणे म्हणाले, मंदिर दिसले नाही का?…

देशातील अनेक तरुणी आपला लग्न सोहळा परदेशात करण्यावर भर देत असतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मागील काही काळापासून वेड इन इंडिया (Wed In India) संकल्पनेवर भर देताना दिसत आहेत. याअंतर्गत बाहेरच्या देशात होणारे भारतीयांचे लग्न समारंभ देशातच केले जावेत, जेणेकरून भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होईल असे आवाहन केले जात आहे. (Rising Rajasthan Global Investment Summit)

राजस्थानमधील पर्यटनाच्या वृद्धीबद्दल पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले की, “मी देशातील नागरिकांना ‘वेड इन इंडिया’चे आवाहन केले आहे. याचा फायदा निश्चित राजस्थानला होईल. राजस्थानमध्ये हेरिटेज टुरिझम, फिल्म टुरिझम, इको टुरिझम, रुरल टुरिझम, बॉर्डर एरिया टुरिझम हे पर्यटनाच्या अर्थव्यवस्थेला बळ देईल. या क्षेत्रांमधील तुमची गुंतवणूक राजस्थानच्या पर्यटन क्षेत्राला बळ देईल आणि तुमचा उद्योग देखील वाढवेल”, असेही मोदी म्हणाले. तसेच भारताने मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आत्मनिर्भर होण्याचा जसा संकल्प केला आहे, तसाच संकल्प वेड इन इंडियाच्या (Wed In India) माध्यमातून करायला हवा, असा सल्लाही पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) तरुणांना दिला. (Wed In India)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.