
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नागपुरातील नेत्र संस्थान आणि अनुसंसाधन केंद्राच्या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचा शिलान्यास पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमासाठी मोदी नागपुरात आले आहेत. नागपुरात आल्यावर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाचे पहिले संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. (PM Narendra Modi)
दोन वेळा दीक्षाभूमीवर येणारे मोदी हे एकमेव पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नागपूर आगमनापूर्वीच संघ प्रमुख मोहन भागवत रेशीमबागेत दाखल झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मोदी थेट संघाच्या संघ स्मृती मंदिरात गेले. याठिकाणी त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या मूर्तीला अभिवादन केलं. पंतप्रधान म्हणून मोदी दुसऱ्यांदा दीक्षाभूमीवर आले आहेत. सलग दोन वेळा दीक्षाभूमीवर येणारे मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत. (PM Narendra Modi)
पंतप्रधान मोदींचा संदेश काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संघ स्मृती मंदिरात हेडगेवारांना अभिवादन केल्यानंतर तिथल्या नोंद वहीत संदेश लिहिला आहे. “परम पूजनीय डॉ. हेडगेवार जी आणि पूज्य गुरुजींना माझा भावपूर्ण नमस्कार. त्यांच्या स्मृतींना वंदन करतो. या स्मृती मंदिरात येऊन मी भारावून गेलो आहे. भारतीय संस्कृती आणि संघटित मूल्यांना समर्पित हे स्थळ राष्ट्रसेवेसाठी पुढे येण्याची प्रेरणा देते. संस्थेच्या दोन मजबूत स्तंभांनी देशाच्या सेवेसाठी समर्पित केलेल्या स्वयंसेवकांसाठी ही ऊर्जा देणारी जागा आहे. आमच्या प्रयत्नांमुळे भारत मातेचा गौरव नेहमीच वाढत राहो!” नरेंद्र मोदी पंतप्रधान, भारत सरकार
राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय इदं न मम। pic.twitter.com/2nxh9OeIbo
— Sambit Patra (@sambitswaraj) March 30, 2025
हेही पहा-
Join Our WhatsApp Community