पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी संसद भवनातील प्रेरणा स्थळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, किरेन रिजिजू, अर्जुन राम मेघवाल आणि पियुष गोयल यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रेरणा स्थळाला भेट दिली. (PM Narendra Modi)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करताना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, “त्यांच्या प्रेरणेमुळेच देश सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आंबेडकरांचे विचार आणि आदर्श आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या निर्मितीला बळ देतील. सर्व देशवासियांच्या वतीने, मी भारतरत्न पूज्य बाबासाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त नमन करतो. त्यांच्या प्रेरणेमुळेच आज देश सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करण्यासाठी समर्पित आहे. त्यांचे विचार आणि आदर्श ‘आत्मनिर्भर’ आणि ‘विकसित’ भारताच्या निर्मितीला शक्ती आणि गती देतील,” असे पंतप्रधान म्हणाले. (PM Narendra Modi)
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) हिसारला भेट देतील, जिथे ते सकाळी 10:15 वाजता हिसार ते अयोध्या दरम्यान व्यावसायिक विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवतील आणि नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करतील. ते एका जाहीर सभेला संबोधित करतील. दुपारी 12:30 वाजता ते यमुनानगरमध्ये विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community