जी २० परिषदेच्या यशस्वी आयोजनानंतर आज म्हणजेच २४ सप्टेंबर रविवार रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पहिल्यांदा आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमामधून जनतेशी संवाद साधला. आज मन की बात या कार्यक्रमाचा १०५ वा भाग होता. या वेळी बोलतांना मोदींनी भारताच्या जी २० आणि चंद्रयान ३ मोहिमेच्या यशाचे कौतुक केले.
यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, “मला पुन्हा एकदा माझ्या देशाचे आणि देशवासीयांचे यश शेअर करण्याची संधी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांत, मला चंद्रयान -3 चे लँडिंग आणि दिल्लीतील G20 च्या यशाबाबत अनेक संदेश आले आहेत. समाजातील प्रत्येक घटकातून मला अनेक संदेश मिळाले आहेत. चंद्रयान -३ चे लँडिंग कोट्यवधी लोकांनी पाहिले. इस्रोच्या यूट्यूब चॅनलवर ही संपूर्ण घटना जवळपास ८० लाख लोकांनी पाहिली. हा एक वेगळा विक्रम आहे.
(हेही वाचा – IND vs AUS : ऑस्ट्रेलियासाठी ‘करो या मरो’ तर भारताला मालिका विजयाची संधी)
जर्मनीच्या मुलीचे कौतुक
पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी मन की बात मधून जर्मनीच्या २१ वर्षीय मुलीचे देखील कौतुक केले आहे. जर्मनीची कॅसमी नावाची मुलगी ही दृष्टिहीन आहे. मात्र तरीदेखील ती खचून गेली नाही. ती जर्मनीची असून तिला भारताविषयी, भारतीय संगीताविषयी अत्यंत गोडी आहे. कॅसमी हीने अनेक भारतीय भाषांवर प्रभुत्व मिळवलं असून ती आसामी, बंगाली, मराठी आणि तमिळमध्येही गाते.
चंद्रयान प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
चंद्रयानाच्या यशानंतर या मोहिमेवर एक प्रश्नमंजुषेची स्पर्धा आयोजित केली गेली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत १५ लाखांहून अधिक लोक सहभागी होत आहेत. स्वतः पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी आजच्या कार्यक्रमातून देशाच्या तरुणांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मोदी म्हणाले की; “मी तुम्हाला यात सहभागी होण्यास सांगेन.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community