‘द काश्मीर फाईल्स’वर पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

161

देशात सध्या प्रत्येकाच्या तोंडात एकाच चित्रपटाचे नाव आहे, तो चित्रपट म्हणजे ‘द काश्मीर फाईल्स’. या चित्रपटाची जोरदार चर्चा असली तरी यावरून वाद देखील निर्माण झाले आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाची संसदीय बैठक मंगळवारी झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमावर पहिली प्रतिक्रिया दिली असून यावेळी ते म्हणाले, सत्य दडपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ११ मार्च रोजी प्रदर्शित झालेला विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट मोदींनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी जमलेल्या सर्वांना पाहण्यास सांगितले. “हा खूप चांगला चित्रपट असून असे चित्रपट आणखी व्हायला हवेत,” असेही पुढे मोदी म्हणाले.

(हेही वाचा – मलिकांना दिलासा नाहीच! ईडीविरोधातील याचिका फेटाळली, आता पुढे काय?)

काय म्हणाले मोदी?

द काश्मीर फाईल्स हा खूप चांगला चित्रपट असून तुम्ही सर्वांनी तो पाहावा. असे चित्रपट आणखी बनवले गेले पाहिजेत. अशा चित्रपटांच्या माध्यमातून लोकांना सत्य कळतं आणि भूतकाळात घडलेल्या घटनांना कोण जबाबदार होते हे देखील समजते. कोणी शोषण केलं किंवा कोणी चांगलं काम केलं हे सांगण्याचा प्रयत्न यांसारखे चित्रपट करतात, अशा शब्दांत मोदींनी कौतुक केले आहे. ज्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तेच आता चित्रपटाला विरोध करत आहेत, असं देखील मोदी म्हणाले.

चित्रपटाच्या टीमने घेतली मोदींची भेट आणि…

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचे घर सोडावे लागले होते. यामध्ये अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत इतरही काही नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी आणि चित्रपटाचे निर्माते अभिषेक यांच्यासह चित्रपटाच्या टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी मोदींनी त्यांचे अभिनंदन करत चित्रपटाचं कौतुक केलं होतं. यासंदर्भातील ट्वीट चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर केले होते.

https://twitter.com/taran_adarsh/status/1502668753657470976

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.