PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी दिल्या जुन्या संसद भवनाच्या आठवणींना उजाळा

157
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी दिल्या जुन्या संसद भवनाच्या आठवणींना उजाळा

संसदेच्या विशेष पाच दिवसीय अधिवेशनाला (PM Narendra Modi) आजपासून म्हणजेच सोमवार १८ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. सरकारने याची घोषणा करताना हे ‘विशेष अधिवेशन’ असल्याचं म्हटलं होतं. हे अधिवेशन सध्याच्या लोकसभेचं तेरावं आणि राज्यसभेचं २६७१ वं अधिवेशन आहे. हे अधिवेश १८ ते २२ सप्टेंबर या काळात सुरु राहणार आहे. उद्यापासून म्हणजेच मंगळवार १९ सप्टेंबर पासून नवीन संसद भवनात कामकाजाला सुरुवात होणार आहे. अशातच पंतप्रधान मोदी यांनी जुन्या संसद मधून आपलं शेवटचं मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

(हेही वाचा – Special Session : जुनं संसद भवन पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील – पंतप्रधान नरेंद्र मोदी)

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

भारतावर संशय घेण्याचा एक स्वभाव अनेक लोकांचा आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून हेच सुरु आहे. यावेळीही असाच संशय घेतला गेला. मात्र भारताने ताकद दाखवून दिली. आज आपण रोडमॅप घेऊन हजर आहोत. जी २० चं अध्यक्षपद नोव्हेंबर अखेरपर्यंत आपल्याकडे आहे. आज आपल्या सगळ्यांसाठी ही गर्वाची बाब आहे की आपला देश विश्व मित्राच्या रुपाने आपली ओळख तयार करतो आहे. संपूर्ण जग आपल्यात (PM Narendra Modi) एक मित्र शोधतो आहे. वेदांपासून विवेकानंदापर्यंत जे आपले संस्कार आहेत त्या संस्काराचं हे यश आहे. सबका साथ सबका विकास या मंत्राने आपण जग जोडलं आहे. या सदनातून निरोप घेणं हा भावूक क्षण आहे. कुठलंही कुटुंबही जेव्हा जुनं घर सोडून नव्या घरात जातं तेव्हा त्यांचंही मन हेलावतं. आज आपल्या प्रत्येकाचीच अवस्था अशीच आहे. अनेक प्रकारचे अनुभव आहेत. कधी संघर्ष झाला आहे, कधी थोडेफार वाद झालेत, कधी प्रचंड उत्साहही पाहिला आहे. या सगळ्या अनुभवांची शिदोरी घेऊन आपण पुढे जात आहोत. त्यामुळे या भवनाचा गौरवही आपला सगळ्यांचा आहे.

स्वतंत्र भारताच्या नवनिर्माणाशी जोडलेल्या अनेक घटनांनी या सदनात आकार घेतला आहे. आज (PM Narendra Modi) आपण हे सदन सोडून नव्या सदनात जाणार आहोत तेव्हा भारतातल्या सामान्य माणसाला जो आदर दिला आहे त्याचीही आठवण करण्याचा हा क्षण आहे. मी पहिल्यांदा जेव्हा खासदार झालो आणि संसदेत आलो तेव्हा अगदी सहजरित्या मी संसदेच्या पायरीवर आपलं डोकं टेकलं होतं. लोकशाहीच्या मंदिराला केलेला तो नमस्कार आजही माझ्या स्मरणात आहे. भारताच्या लोकशाहीची ताकद काय आहे ते मी अनुभवलं आहे. लोकांच्या श्रद्धेचं ही ताकद आहे की रेल्वे प्लॅटफॉर्मवर काम करणारा एक मुलगा खासदार झाला, पंतप्रधान (PM Narendra Modi) झाला याची मी कल्पनाही केली नव्हती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.