राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत उत्तर दिले. पंतप्रधान मोदी बोलताच विरोधी पक्षांनी अदानीच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू केला. त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, सभागृहातील काही लोकांचे वागणे आणि भाषणे केवळ सभागृहाचीच नव्हे तर देशाची निराशा करणारे आहे. मी सदस्यांना सांगू इच्छितो की, ‘तुमच्याकडे चिखल होता, गुलाल माझ्याकडे होता…जे ज्याच्याकडे होते ते त्यांनी उडवले, तुम्ही जितका चिखल फेकाल तितके कमळ फुलेल, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला हाणला.
गेल्या दशकांमध्ये अनेक विचारवंतांनी या सभागृहातून देशाला दिशा दिली आहे. देशाला मार्गदर्शन केले. असे अनेक मित्र या सभागृहात आहेत. ज्यांनी वैयक्तिक आयुष्यातही अनेक यश संपादन केले आहे. त्यानी मोठी कामे केली आहेत. त्यामुळे या सभागृहात जे काही घडते ते देश गांभीर्याने ऐकतो. एक काळ असा होता की, एखाद्या गावात हातपंप बसवला की आठवडाभर त्याचा उत्साह असायचा. जलसंधारण, जलसिंचन या प्रत्येक बाबीकडे आपण लक्ष दिले आहे. गेल्या तीन-चार वर्षांत 11 कोटी घरांना नळाला पाणी मिळत आहे. पाण्याशिवाय कोणतेही कुटुंब जगू शकत नाही. भविष्याचा वेध घेत आम्ही समाधानाचा मार्ग निवडला. यापूर्वी आपल्या देशात प्रकल्प रखडणे, विलंब करणे, प्रकल्प वळवणे हा त्यांच्या कार्यशैलीचा भाग झाला होता. ही त्यांची काम करण्याची पद्धत होती. प्रामाणिक करदात्यांच्या कमाईचे नुकसान झाले. आम्ही तंत्रज्ञान तयार केले, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
(हेही वाचा काँग्रेसनं ६ दशकं देशाचं वाटोळं केलं, आता जनता त्यांचं खातं बंद करतंय; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल)
मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
काल मल्लिकार्जुन खरगे तक्रार करत होते की, मोदीजी वारंवार माझ्या मतदारसंघात येतात. मी त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही ते पाहिले आहे, पण तुम्ही हे देखील पहावे की 1 कोटी 70 लाख जन धन बँक खाती उघडली गेली आहेत. त्यातील एकट्या कलबुर्गीमध्ये ८ लाख जनधन खाती उघडण्यात आली आहेत. हे पाहून मी त्यांची वेदना समजू शकतो. तुम्ही दलितांबद्दल बोला, त्याच ठिकाणी निवडणुकीत दलितांना विजय मिळाला हेही पहा. आता जनता तुम्हाला नाकारतेय म्हणून तुम्ही इथे रडत आहात. गरिबांना बँकांचा हक्क मिळावा, या उद्देशाने काँग्रेस सरकारने बँकांचे सरकारीकरण केले, मात्र या देशातील निम्म्याहून अधिक जनतेला बँकांच्या दारापर्यंत पोहोचता आले नाही. कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आम्ही जन-धन बँक खाती उघडली. या माध्यमातून देशाच्या खेड्यापाड्यात प्रगतीपथावर नेण्याचे काम केले आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी गांधी कुटुंबावर थेट हल्लाबोल केला. मोदी म्हणाले की, नेहरूजींचे नाव वगळले, तर अनेक अस्वस्थ होतात, नेहरू आडनाव घ्यायला किती लाज वाटते. गांधी घराण्याला आज कोणी नेहरू आडनाव का ठेवत नाही? असा सवालही पंतप्रधान मोदी यांनी विचारला. .
आज सरासरी 22 तास वीज मिळत आहे
पूर्वीच्या सरकारांमध्ये वीज काही तासांसाठी यायची. गावाच्या मधोमध खांब टाकला की ते दरवर्षी त्याची बातमी करायचे. आज आपल्या देशात सरासरी 22 तास वीज दिली जाते. या कामासाठी नवीन ट्रान्समिशन लाईन टाकायची होती. नवीन ऊर्जा निर्मितीसाठी काम करावे लागले. सौरऊर्जेच्या क्षेत्रात काम करावे लागेल. आम्ही लोकांना त्यांच्या नशिबी सोडले नाही. राजकारणात नफा-तोट्याचा विचार केला नाही. येणारा उद्याचा दिवस उज्वल करण्याचा विचार केला, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
Join Our WhatsApp Community