PM Narendra Modi यांचा घाटकोपरमधील रोड शो महायुतीसाठी ठरला बुस्टर डोस

घाटकोपर परिसर निवडण्यामागे महत्वाचे उद्देश मराठी आणि गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. यामुळे दोन्ही भाषिक मतदारांना प्रभावित करणे भाजपला सोपे झाले.

317

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील अंतिम आणि पाचव्या टप्प्यातील प्रचाराला अखेरचे दोन-तीन दिवस राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) मुंबईतील घाटकोपरमध्ये भव्य रोड शो पार पडला. या रोड शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे उमेदवार आणि महायुतीचे पदाधिकारी सहभागी झाले. शुक्रवारी, १७ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये महायुतीचा महाविजय संकल्प सभा पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा रोड शो महत्वाचा मानला जात होता. घाटकोपरच्या अशोक सिल्क मिल जवळून मोदींच्या रोड शोला सुरुवात झाली आणि घाटकोपर पूर्वेकडील पार्श्वनाथ जैन मंदिराजवळ त्याचा समारोप झाला. या रोड शोमुळे मुंबई आणि महामुंबई परिसरातील मतदारसंघात महायुतीला बुस्टर डोस मिळाला आहे.

रोड शो मार्गावर लोकांची प्रचंड गर्दी

भाजपाचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यासह मुंबईच्या सहा मतदारसंघातील उमेदवारांच्या एकत्रित प्रचारासाठी हा रोड शो आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधानांचा रोड शो होत असलेल्या मार्गावर लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. संपूर्ण घाटकोपरमध्ये भगवेमय झाले आहे. साधू, संत, महात्मे देखील यावेळी उपस्थित होते. तर काही वारकरी देखील मोदींचे स्वागत करण्यासाठी आले होते. समारोपाच्या जागेवर प्रभू श्रीरामांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. पुतळ्याला अभिवादन करून रोड शोचा समारोप होणार आहे. या रोड शोसाठी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचा देखील वापर करण्यात आला. (PM Narendra Modi)

(हेही वाचा मथुरा, वाराणसीत मंदिरे उभारण्यासाठी भाजपाला ४०० पार करा; Himanta Biswa Sarma यांचे आवाहन)

लिसांसह सुरक्षा व्यवस्था मोठा बंदोबस्त

घाटकोपर परिसर निवडण्यामागे महत्वाचे उद्देश मराठी आणि गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. यामुळे दोन्ही भाषिक मतदारांना प्रभावित करणे भाजपला सोपे झाले. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा दुवा असे घाटकोपर हे मध्यवर्ती ठिकाण असून घाटकोपरला उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई हे पाच लोकसभा मतदारसंघ जोडतात. याचा फायदा पियुष गोयल, रविंद्र वायकर, मिहिर कोटेचा, उज्ज्वल निकम, राहुल शेवाळे या उमेदवारांना होणार आहे. घाटकोपरमध्ये उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय दोन्ही प्रकारचे लोक राहतात. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात हिंदू मतदार आहेत. (PM Narendra Modi)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.