PM Narendra Modi म्हणाले काँग्रेस भ्रष्टाचाराची जननी तर झामुमोवर केली सडकून टीका

जमशेदपूर, झारखंडमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि झामुमोने आपल्या घरात बराच काळा पैसा ठेवला आहे. काँग्रेस आणि झामुमोसारख्या पक्षांनी आमच्या झारखंडला प्रत्येक संधीवर लुटले आहे. काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी आहे. त्याचा विकासाशी काहीही संबंध नाही.

142
NDA Govt : मोदींच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, राज्यातील कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार?

देशभरात २०२४ (Lok sabha Election 2024) च्या लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असून, राज्यात येत्या सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहेत. तर इतर राज्यातील सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील प्रचार सभा सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  झारखंडमधील (Prime Minister Narendra Modi Jharkhand) जमशेदपूरमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चावर (Jharkhand Mukti Morcha) जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या लोकांना विकासाची पर्वा नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांचा संबंध फक्त भ्रष्टाचार आणि खोटे बोलण्याशी आहे. काँग्रेस आणि झामुमोने (JMM) आपल्या घरात काळ्या पैशाचा ढीग ठेवला आहे. असे विधान पंतप्रधान मोदींनी केले. (PM Narendra Modi)

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि झामुमोसारख्या पक्षांनी आमच्या झारखंडला प्रत्येक संधीवर लुटले आहे. काँग्रेस (Congress) ही भ्रष्टाचाराची जननी आहे. काँग्रेस आणि झामुमोच्या लोकांना विकासाचा A, B, C, D सुद्धा माहित नाही. गरिबांच्या मालमत्तेचा एक्स-रे करणे, एससी-एसटी-ओबीसीचे आरक्षण हिसकावणे, मोदीजींना रोज शिव्या देणे हे त्यांचे मुद्दे आहेत. यापलीकडे ते विचार करू शकत नाहीत. अशा कडक शब्दात विरोधकांना सुनावले.  (PM Narendra Modi)

जेएमएमने आदिवासी आणि लष्कराच्या जमिनी बळकावल्या

झारखंडमध्ये (Jharkhand) झामुमोने जमीन घोटाळा केला, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांनी गरीब आदिवासींच्या जमिनी बळकावल्या, लष्कराच्या जमिनी बळकावल्या. त्यांच्या घरातून जप्त झालेल्या चलनी नोटांचे डोंगर तुमचे आहेत. असे जनतेला उद्देशहून पंतप्रधान मोदी म्हणाले. या अप्रामाणिक लोकांच्या घरात लपून ठेवलेले पैसे पंत मोदी शोधून काढणार आहेत. आणि नंतर हे पैसे सरकारी तिजोरीत नेण्यासाठी वसूल करणार नसून, त्या गरीब लोकांना परत करण्याचा मार्ग शोधत आहे. ही मोदींची गॅरंटी (Modi’s guarantee) आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी लोकांना दिला. (PM Narendra Modi)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.