PM Narendra Modi म्हणाले ईडी चांगले काम करते

मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्यांनी माझ्या गृहमंत्र्याला तुरुंगात टाकले होते, हे देशाने समजून घेतले पाहिजे की, ED ची केवळ तीन टक्के प्रकरणे राजकारणाशी संबंधित नसलेल्या लोकांवर आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

193
Narendra Modi: शिवसेनेने कॉंग्रेससोबत जाऊन स्वतःचे हिंदुत्व गमावले; पंतप्रधानांनी ठाकरेंवर साधला निशाणा

ईडी आज उत्कृष्ट काम करत आहे. एजन्सीच्या 97 टक्के प्रकरणे राजकारणात सहभागी नसलेल्या लोकांविरुद्ध आहेत. इतकंच नाही तर भाजपच्या काळात ईडी आणि सीबीआयशी संबंधित कोणतेही कायदे बनवण्यात आले नाहीत, उलट भाजप सरकारने निवडणूक आयोग बदलण्यासाठी कायदा आणला. याआधी कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तींनाच निवडणूक आयुक्त बनवले जायचे, नंतर त्यांना राज्यसभा किंवा इतर मंत्रालयांवर पाठवले जायचे. पण भाजप त्या पातळीचे काम करू शकत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

ईडीची केवळ तीन टक्के प्रकरणे राजकारणाशी संबंधित

एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. प्रामाणिक माणसाला कोणाची भीती बाळगण्याची गरज नसते. पण भ्रष्टाचाराने वेढलेल्यांना पापाची भीती असते. आज किती विरोधी नेते तुरुंगात आहेत? मला कोणी सांगत नाही. आणि हेच विरोधी नेते आहेत का जे आधी सरकार चालवत होते?  शेवटी, प्रामाणिक माणसाला कशाची भीती वाटते? मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्यांनी माझ्या गृहमंत्र्याला तुरुंगात टाकले होते, हे देशाने समजून घेतले पाहिजे की, ED ची केवळ तीन टक्के प्रकरणे राजकारणाशी संबंधित नसलेल्या लोकांवर आहेत.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : अखिल भारतीय मराठा महासंघाचा महायुतीला पाठिंबा)

राम मंदिराचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला 

राम मंदिराच्या घटनेचे आम्ही राजकारण करत नाहीत. आमचा जन्मही जेव्हा झाला नव्हता. आमचा पक्षही जेव्हा स्थापन झाला नव्हता. तेव्हाच हा विषय न्यायलयात निकाली काढला जाऊ शकत होता. तेव्हाच समस्या सुटली असती. भारताची फाळणी झाली, तेव्हाही काही गोष्टींची स्पष्टता आणून हा प्रश्न सोडविला जाऊ शकत होता. पण तो सोडवला गेला नाही. मतपेटीच्या राजकारणासाठी या विषयाचा शस्त्राप्रमाणे वापर केला गेला. यासाठी हा विषय मार्गी न लावता त्याला पुन्हा पुन्हा हवा दिली गेली. एवढेच नाही तर न्यायालयात यावर निर्णय होऊ नये, म्हणून अडचणी निर्माण केल्या गेल्या, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. सोमनाथ मंदिराच्या वेळीही तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांना जाऊ दिले नाही. प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण धुडकावून तुम्हाला काय मिळाले? तुमच्या सर्व जुन्या चुका बाजूला ठेवून घरी येऊन तुम्हाला निमंत्रण दिले, तरी तुम्ही त्याला फेटाळून लावले. यापेक्षा मोठी चूक काय असू शकते?, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.