देशाची अस्तित्व जुन्या नियमांचा विचार केल्याने मजबूत होणार नाही. आधुनिकतेसोबत जाताना आपल्याला नियम आणि परंपरांमध्ये बदल करायचा असेल, तर त्याला ३०-४० वर्षे लागून चालत नाही. वेगाने चालणाऱ्या या जगासोबत जायचे असेल तर आपल्याला प्रत्येक क्षणाचा विचार करायला पाहिजे, त्यामुळे आपण मागील ५ वर्षांत तब्बल १,५०० कायदे बदलले आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
नागरिकांवर शेकडो कायद्यांचे ओझे
नागरी सेवा दिनानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात हे बोलत होते. या दिनानिमित्ताने ज्यांना पुरस्कार करून गौरवण्यात आले, त्यांचे अभिनंदन करतो, आपल्या देशात शेकडो कायदे आहेत. त्याचे ओझे घेऊन नागरिक चालत असतात. अशा लोकशाहीमध्ये सामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी त्यांच्या जीवनात बदल आणि बदलाची जाणीव होणे आणि दुसरे म्हणाले जे काही करू ते जागतिक पातळीवर करू, असे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. आपल्या देशाची एकता आणि अखंडता राखण्याची जबाबदारी असल्याचं मोदी म्हणाले. देशातील सामान्य माणासाचं स्वप्न संकल्पात बदलण्यासाठी व्यवस्थेनं प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
(हेही वाचा रत्नागिरीतील वीर सावरकर विद्यालयाला आवश्यक निधी देणार! उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन)
विकासात योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करा
स्वातंत्र्याची ७५ वर्ष होत आहेत.स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा होत असताना हा कार्यक्रम होत आहे. आपण ज्या जिल्ह्यात काम करत आहात त्या ठिकाणी जिल्ह्याचे प्रमुख म्हणून काम केलेल्या सध्या हयात असलेल्या अधिकाऱ्यांना बोलावायला पाहिजे. आपण अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. तुमच्या जिल्ह्यात काम केलेल्या अधिकाऱ्यांनी त्याच्या विकासासाठी योगदान दिलेले आहे. नागरी सेवांच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांचा आपण सन्मान केला पाहिजे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
Join Our WhatsApp Community