विद्यार्थ्यांना एकदा तरी अंदमानात नेऊन वीर सावरकरांनी भोगलेल्या यातना दाखवा! पंतप्रधानांचे आवाहन

152

महाराष्ट्रातील राजभवनातील क्रांतिकारकांची गॅलरी ही स्वातंत्र्य सैनिकांची यशोगाथा सांगणारी आहे. शिक्षण विभागाला मी विनंती करतो की, त्यांनी विद्यार्थ्यांना वर्षातून १-२ वेळा पर्यटनस्थळी सहलीला घेऊन जाताना कधीतरी अंदमान-निकोबार येथे नेऊन तेथील कारागृह दाखवा, जिथे वीर सावरकर यांनी स्वतःचे तारुण्य समर्पित केले, कधी तरी राजभवनात क्रांतिकारकांच्या गॅलरीला भेट द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

सरकारच्या आत्मनिर्भर अभियानाची ताकद स्वातंत्र्य चळवळ 

महाराष्ट्राचे राजभवन मागील दशकांपासून अनेक लोकशाहीच्या घटनांच्या साक्ष बनलेले आहे. राजभवनाची नवीन वास्तू ही महाराष्ट्रातील जनता आणि महाराष्ट्रातील प्रशासन यांना नवीन ऊर्जा देईल, हे राजभवन नाही तर लोकभवन बनले आणि जनता जनार्दनासाठी आशेचे केंद्र बनेल. राजभवनाला आधुनिकतेचे स्वरूप देताना महाराष्ट्राच्या परंपरेनुसार आस्था, शौर्य आणि अध्यात्मिक संस्कृतचे दर्शन घडवून दिले. इथे आत स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांच्या गाथांना स्थान दिले, त्यामुळे राष्ट्रप्रेम अधिक सशक्त होईल. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे, यानिमित्ताने क्रांतीकारकांचे स्मरण करणे आवश्यक ठरते. महाराष्ट्राचे यात मोठे योगदान आहे. सामाजिक क्रांतीचा विषय घेतला तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंतची समृद्ध परंपरा आहे. स्वराज्याचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य आजही राष्ट्राभिमान चेतवते. स्वातंत्रलढ्याचा विषय येतो तेव्हा त्यातही अनेक प्रभुतींचे स्मरण होते, ज्यांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली. आज येथून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या वीरतेचे स्मरण होते, त्यांनी कसे त्यावेळच्या पिढीमध्ये स्वातंत्र्याचा विचार रुजवला. भारताच्या स्वातंत्र्यामध्ये ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांनी सहभाग घेतला आहे. लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, मॅडम भिकाजी कामा या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने स्वातंत्र्याच्या आंदोलनाला योगदान दिले. तिरंग्याचे प्रेरणास्रोत मॅडम भिकाजी कामा आणि श्यामजी कृष्ण वर्मा होते. आंदोलनाचे स्वरूप लोकलही होते आणि ग्लोबलही होते. गदर भारती, श्यामजी कृष्ण वर्मा यांचे लंडनमधील इंडिया हाऊस जिथे स्वातंत्र्यसैनिकांची घर बनले होते, हे सगळे विदेशात होते पण लक्ष स्वातंत्र्य होते. नेताजींच्या नेतृत्वाखाली फौज लोकल होती पण ती ग्लोबल होती, हीच भावना आत्मनिर्भर अभियानाची ताकद आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

(हेही वाचा वीर सावरकरांनी कारागृहात संत तुकारामांचे अभंग गायले – पंतप्रधान मोदी)

७ दशके उलटली तरी राजभवनातील भुयार माहिती नव्हते

मागील ७ दशकामध्ये महाराष्ट्राने राष्ट्रीय विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. मुंबईत विकासकामे होत आहेत, विकासाच्या यात्रेत महाराष्ट्र मागे नाही, विविधांगी विकास होत आहे. जगातील लोक थट्टा करतील, मागील ७५ वर्षे राजभवनात गतिविधीय सुरु आहेत पण मागील ७ दशके उलटली पण आपल्याला कळलेच नाही की येथे एक भुयार होते, म्हणजे आपण किती उदासीन होतो. शामजी कृष्ण वर्मा यांना लोकमान्य टिळकांनी पत्र लिहून सांगितले की, मी विनायक दामोदर सावरकर यांना लंडन येथे पाठवत आहे. त्यांना मदत करावी. त्यांनी इंडिया हाऊस लंडनमध्ये बांधले जे क्रांतिकारकांचे घर बनले होते. त्यांचे निधन १९३० मध्ये झाले. तेव्हा त्यांनी ईच्छा व्यक्त केली होती की. माझ्या अस्थी जतन केल्या जाव्यात आणि जेव्हा हिंदुस्थान स्वतंत्र होईल तेव्हा माझ्या अस्थी तिथे न्याव्यात. त्या अस्थी १५ ऑगस्ट १९४७ च्या दुसऱ्या दिवशी इथे आणल्या गेल्या पाहिजे होत्या, पण तसे झाले नाही २००३ साली ७३ वर्षांनी मला त्या अस्थी आणण्याचे सौभाग्य मला मिळाले. कच्छ मांडवी त्यांचे जन्मस्थान आहे, तिथे लंडनप्रमाणेच इंडिया हाऊस बनवेल आहे. ही प्रेरणा असली पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.