मोदी म्हणाले, पुढच्या 25 वर्षांचं लक्ष्य ठरवण्याची हीच ती वेळ

125

स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात देश पुढच्या 25 वर्षांचं लक्ष्य ठरवत आहेत. भाजपाचीही पुढच्या 25 वर्षांचं लक्ष्य ठरवण्याची हीच ती वेळ आहे. देशातल्या लोकांच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करायच्या आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. जयपूर येथे आयोजित भाजपच्या बैठकीला आभासी पद्धतीने संबोधित करताना ते बोलत होते.

काय म्हणाले मोदी…

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, जगाच्या भारताकडून खूप अपेक्षा आहेत. तसेच देशातही भाजपाबद्दल लोकांच्या मनात विशेष प्रेमाची भावना आहे. देशातली जनता भाजपाकडे विश्वासाने, अपेक्षेने पाहत आहे. आपल्याला देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. देशाच्या जनतेच्या आशा-आकांक्षांमुळे आपले दायित्व अधिक वाढले आहे. देशासमोरची आव्हाने जनतेसोबत राहून आपल्याला परतवून लावायची आहेत. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हाच आपला मंत्र असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

(हेही वाचा – भाजपच्या पडळकरांनी चूक दाखवताच पवारांनी डिलीट केले ‘ते’ ट्वीट)

राजस्थानच्या जयपूरमध्ये गुरुवारपासून सुरू असलेल्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हजेरी लावली. या बैठकीत यावर्षी गुजरात, हिमाचलमध्ये होणाऱ्या तसेच पुढच्या वर्षी अनेक राज्यात होणाऱ्या निवडणुका आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबद्दलची चर्चा होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.