पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे उद्या 13 जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर आहेत. पण त्यापूर्वीच त्यांच्या सुरक्षेविषयीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या सुट्टीवर आलेल्या लष्करातील जवानामुळे मोठी गडबड उडाली होती. पण वेळीच ही चूक सुरक्षा अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. प्रकरणात पोलिसांनी अखेर या जवानाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सुरक्षा यंत्राणांची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्याअनुषंगाने सुरक्षा यंत्राणांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही मुंबई पोलीस आणि एनएसजी अधिकार्यांची खासगी बैठक होती. या बैठकीला लष्कारातून सुट्टीवर आलेल्या एका जवानाने हजेरी लावण्याचा प्रयत्न केला. आपण एनएसजी अधिकारी असल्याचा बनाव त्याने केला. गोरेगावच्या नेस्को येथे सुरक्षेच्या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली. लष्करातून सुट्टीवर आलेला रामेश्वर मिश्रा तिथे हजर झाला. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बैठकीत मिश्राने ब्लेजर, टाय अशी ड्रेसिंग करून लावली हजेरी लावली. आपण एनएसजी अधिकारी असल्याचा बनाव त्याने केला. पण त्याच्यावर अधिकाऱ्यांना संशय आला. त्याने ही बाब हेरली. त्याचवेळी त्याला पकडण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो फरार झाला होता. (PM Narendra Modi)
(हेही वाचा –VidhanParishad Election 2024 : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक, मतदानाला सुरूवात)
रामेश्वर मिश्राने हे कृत्य काही पहिल्यांदा केले नाही. त्याने यापूर्वी पण असाच प्रकार केला होता. प्रकरणात बैठकीतून निसटलेल्या मिश्राला वनराई पोलिसांनी अटक केली आहे. मिश्रा सध्या पोलीस कोठडीत आहे. गेल्यावर्षी पंतप्रधानांच्याच दौऱ्यात त्याने असाच बनाव केला होता. त्यावेळी पण त्याचा बनाव उघड झाला होता. गेल्यावेळी त्याला बीकेसी पोलिसांनी अटक केली होती. (PM Narendra Modi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community