काँग्रेसनं ६ दशकं देशाचं वाटोळं केलं, आता जनता त्यांचं खातं बंद करतंय; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

182

राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर गुरुवारी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रचंड गदारोळ सुरू केला. तरीही पंतप्रधान मोदींनी आपलं भाषण सुरू ठेवून विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं. ६० वर्षात काँग्रेसनं देशात खड्डेच खड्डे खोदून ठेवलेत. ६ दशकं काँग्रेसनं फक्त देशाचं वाटोळं केलं. त्यामुळे आता जनता काँग्रेसचं खातं बंद करतंय, असं म्हणतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

दरम्यान बुधवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी यांनी काँग्रेसनं रचलेल्या मजबूत पायाचं श्रेय घेत असल्याचं म्हणाले होते. ६० वर्षांपासून काँग्रसनं देशाचा मजबूत पाया रचला आणि त्यांचं श्रेय पंतप्रधान मोदी घेत असल्याचं खरगे म्हणाले होते. यालाच उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘६० वर्षे काँग्रेस कुटुंबानं केवळ देशात खड्डेच खड्डे खोदून ठेवल्याचं दिसून आलं आहे. ६ दशकं काँग्रेस देशाचं वाटोळं केलं. या काळात जगातील छोटं-छोटे देशही यशाच्या शिखरावर पोहोचले होते.’

पुढे मोदी म्हणाले की, ‘आता देशातील जनता काँग्रेसचं खातं बंद करत आहे. पूर्वी प्रकल्प लटकायचे, अडकायचे, भटकायचे. आज आठवडाभरात आराखडा तयार होतो. तसंच काँग्रेसनं कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे आम्ही आव्हान पाहून पळून जाणारे लोकं नाही.’

‘माती त्यांच्याकडे होती, माझ्याकडे गुलाल होता. त्यामुळे ज्याच्याकडे जे आहे, ते त्यानं उधळलं. जेवढा चिखलं फेकाल, तेवढंच कमळ चांगलं फुलेलं,’ असं मोदी म्हणाले.

(हेही वाचा – नाना पटोलेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार टिकलं असतं; काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान)

 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.