२००४-२०१४ स्वतंत्र भारतातील सर्वात भ्रष्ट दशक; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

137
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. आदल्या दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर कडाडून टीका केली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हेही सभागृहात हजर होते. यावेळी २००४ ते २०१४ ही काँग्रेसप्रणित युपीए सरकारच्या काळातील १० वर्षे स्वतंत्र भारतातील सर्वाधिक भ्रष्ट दशक होते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

काँग्रेसकडून बेकारी दूर करण्याचे केवळ आश्वासन 

काका हाथरसी यांनी म्हटले होते की, आगे पिच्छा देख कर क्यो होते गंभीर, जैसी जिसकी भावना वैसे दिखे सीन. ही निराशा उगाच येत नाही. एकतर जनतेने वारंवार नाकारणे, यासोबत अंतर्मनात निर्माण झालेल्या उदासीनता शांत झोपू देत नाही २००४ ते २०१४ पर्यंत भारताचे हे हाल केले, आता सगळे चांगले होत असल्याचे पाहून निराशा वाढणारच. ज्यांनी बेकारी दूर करण्याचे आश्वासन दिले होते, त्यांनी फक्त आश्वासन दिले. एकदा जंगलात दोन तरुण शिकारीसाठी गेले आणि ते गाडीत बंदूक ठेवून थोडे फिरायला गाडीच्या बाहेर आले, तितक्यात समोर वाघ दिसला, त्यावेळी ते तरुण वाघाला त्यांच्याकडील बंदुकीचा परवाना दाखवत होते. अशाप्रकारे काँग्रेसने बेकारी दूर करण्याचे आश्वासन दिले, केले काहीच नाही, पण बेकारी दूर करणार असल्याचा कायदा मात्र दाखवत राहिले, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

‘मोदीने जनतेच्या सेवेसाठी आयुष्य दिले’

२००४ ते २०१४ हे स्वातंत्र्य भारतातील सर्वात घोटाळ्याचे दशक होते. काश्मीर ते कन्याकुमारी दरम्यान या काळात दहशतवादी हल्ले होत राहिले. हिंसाच होत राहिली. १० वर्षांत जागतिक व्यासपीठावर भारताचा आवाज जग ऐकत नव्हते. या काळात कोळसा घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा, २ जी स्पेक्ट्रम घोटाळा याने भारताची बदनामी झाली. देशात दहशतवादी हल्ले होत राहिले, त्यामुळे दहशतवाद्यांचे सामर्थ्य वाढत गेले. जेव्हा सीमेवरील ताकद दाखवण्याची संधी आली तेव्हा लढाऊ हेलिकॉप्टर घोटाळा समोर आला. आज देशाच्या क्षमतेचा परिचय होत आहे, हेही त्यांच्या निराशेचे कारण बनले आहे. अनेक दिवसापासून मी प्रतीक्षा करत होतो की, कुणी तरी अभ्यास करून येईल, पण केवळ शिव्या शाप शिवाय दुसरे काही नाही, निवडणूक हरले तर ईव्हीएमवर आरोप करतात, सर्वोच्च न्यायालयावर आरोप करतात, भ्रष्टाचाराचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणांवर आरोप करतात. हार्वर्ड विद्यापीठात काँग्रेसच्या अधोगतीवर अभ्यास सुरु आहे. येत्या काळात जगभरात काँग्रेसच्या अधोगतीवर अभ्यास होईल. जे अहंकारात बुडाले आहेत, त्यांना वाटते मोदींना शिव्या दिल्यावरच रस्ता सापडेल, २२ वर्षे ते या गैरसमजुतीत आहेत. मोदींवर विश्वास वर्तमानपत्रातील हेडिंग आणि टीव्हीवरील चमकणाऱ्या चेहऱ्यामुळे वाढली नाही, तर मोदीने जनतेच्या सेवेसाठी आयुष्य दिले आहे. हे त्यांना समजण्याच्या पुढचे आहे. खोटे आरोप लावणाऱ्यांवर मोफत धान्य घेणारी ८० कोटी जनता विश्वास ठेवेल का?  असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी केला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.