मोदी म्हणाले, ‘मी फक्त एक ड्रोन पाठवतो आणि कोणाला कळायच्या आत…’

153

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला आता 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात प्रत्येक कामात तंत्रज्ञानाचा वापर करुन ते काम अधिक सोपे आणि अद्ययावत करण्याकडे मोदींचा कल राहिलेला आहे. त्यामुळे सरकारी कामांची पाहणी करतानाही मोदी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करत असल्याचे मोदींनी आता स्वतः सांगितले आहे. मी कुठल्याही कामाची पाहणी करण्यासाठी ड्रोनद्वारे माहिती मिळवत असल्याचे भारत ड्रोन महोत्सवात मोदींनी सांगितले आहे.

कोणाला कळायच्या आत मला माहिती मिळते

कुठल्याही सरकारी कामाच्या दर्जाची मला माहिती मिळवायची असेल तर मला त्याठिकाणी प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. कारण मी दर्जाची पाहणी करण्यासाठी येणार असे आधीच सांगितले, तर मी येणार म्हणून ते काम लगेच सुधारले जाईल. पण मी एक ड्रोन पाठवतो आणि कोणाला कळायच्या आत माझ्याकडे विकासकामांची संपूर्ण माहिती पोहोचलेली असते, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

(हेही वाचाः EPFO: या चुका झाल्या तर तुमचे PF अकाऊंट बंद होऊ शकते)

कामातील अडथळे दूर करणे सोपे

प्रत्येक महिन्यात मी प्रत्येक राज्यातील विकासकामांचा आढावा घेत असतो. ज्याठिकाणी विकासकामे सुरू आहेत त्याठिकाणी ड्रोनचे लाईव्ह प्रेझेंटेशन दाखवण्याचा आग्रह मी सर्व अधिका-यांकडे धरतो. त्यामुळे कामाचा दर्जा ते करताना येणारे अडथळे याची मला माहिती होते. त्यामुळे निर्णय घेणे अधिक सोपे आणि जलद होते, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

दोन दिवसीय ड्रोन महोत्सव

देशाची राजधानी दिल्लीत सध्या दोन दिवसीय भारत ड्रोन महोत्सव 2022 सुरू आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मोदींनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या महत्वाविषयी भाष्य केले आहे. याठिकाणी वेगवेगळ्या ड्रोन्सचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. भारतातले हे ड्रोन तंत्रज्ञान पाहून मी अक्षरशः आश्चर्यचकीत झाल्याचेही मोदी यांनी यावेळी सांगितले.

(हेही वाचाः उद्धव ठाकरेंवर टीका करताना सोमय्यांची जीभ घसरली; म्हणाले, “असा *#@#* मुख्यमंत्री..”)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.