नरेंद्र मोदींचा भाषणाच्या सुरुवातीलाच राहुल गांधींवर निशाणा; म्हणाले…

115

लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत असताना राष्ट्रपतींचे अभिनंदन केले. त्यानंतर ते म्हणाले की, मी काल पाहत होतो, काहींच्या भाषणावेळी समर्थक उड्या मारत होते. खूप आनंदी होते. ‘ये हुई ना बात’ म्हणून शाबासकीही दिली. काल त्यांना चांगली झोप लागली असावी आणि त्यामुळे कदाचित आज ते उठू शकले नाही, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान काहीनी टीका करण्याचा प्रयत्न केला. तसेच एका मोठ्या नेत्याने त्यांचा अपमानही केला, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. अशा लोकांना म्हटले जाते की, ‘यह कह कह कर हम दिल को बहला रहे है, वो अब चल चुके है, वह अब आ रहे है’, असे म्हणत मोदींनी राहुल गांधींना टोला लगावला. दरम्यान, आव्हानांशिवाय आयुष्य नाही. मात्र आव्हानांपेक्षा जास्त सामर्थवान १४० कोटी जनतेचे सामर्थ्य आहे. आव्हानांपेक्षा त्यांचं धैर्य, साहस मोठे आहे. कठीण काळ, युद्धासारखी परिस्थिती, अनेक देशात असलेली अस्थिरता, भीषण महागाई, अन्नाचा तुटवडा आणि आपल्या शेजारील देशात नागरिकांना खायला अन्न मिळत नाही. अशावेळीही आपला भारत देश जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे, असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी भाषणात म्हटले.

(हेही वाचा शिवसेनेत पक्षातंर्गत निवडणूक घेतल्याचे पुरावे द्या; राहुल शेवाळे यांचे आव्हान)

आदरणीय राष्ट्रपती महोदयांनी आदिवासी समाजाचा गौरव तर वाढवलाच. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर आदिवासी समाजाचा गौरव वाढतो आहे, आत्मविश्वास वाढतो आहे. त्यामुळेच हे सभागृह आणि संपूर्ण देश त्यांचा आभारी आहे. राष्ट्रपतीच्या भाषणात संकल्प ते सिद्धीचा मुद्दा मांडला. जनतेला त्यांनी आपल्या भाषणातून प्रेरणा दिली. प्रजासत्ताकाचे प्रमुख म्हणून त्यांची उपस्थितीत ऐतिहासिकही आहे आणि देशाच्या कोट्यवधी बहिणी-मुलींसाठी प्रेरणाही आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.