प्लास्टिक बाटल्यांपासून तयार केले पंतप्रधान मोदींचे खास जॅकेट, किंमत किती जाणून घ्या

134

संसदेत दुपारी ३ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधन करणार आहेत. यावेळी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी निळ्या रंगाचे खास जॅकेट घालून आले या जॅकेटची सर्वत्र चर्चा रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे जॅकेट प्लास्टिकच्या बाटल्यांना रिसायकल करून तयार करण्यात आले आहे.

( हेही वाचा : महाड MIDC मध्ये भीषण आग! ५ जण जखमी )

 जॅकेटची किंमत फक्त २ हजार रुपये 

इंडिया एनर्जी वीकदरम्यान इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने हे जॅकेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिले आहे. हे जॅकेट पीईटी बाटल्यांचे रिसायकल करून बनवण्यात आले आहे. इंडिया एनर्जी वीकचे उद्दिष्ट ऊर्जा परिवर्तनामध्ये भारताला महाशक्ती बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

या जॅकेटसाठी १५ बाटल्यांची आवश्यकता असते. तसेच फूल ड्रेस तयार करण्यासाठी २८ बाटल्या लागतात. या जॅकेटला रंगवण्यासाठी पाण्याचा वापर केला जात नाही. प्लास्टिक बाटल्यांपासून तयार केलेल्या या जॅकेटची किंमत फक्त २ हजार रुपये आहे.

पंतप्रधानांचे जॅकेट कसे तयार झाले?

इंडियन ऑईलने PET बॉटलद्वारे तयार केलेले ९ रंगाचे वेगवेगळे कपडे पाठवले होते. यातील एक कपडा पीएम मोदींसाठी निवडण्यात आला आणि त्यानंतर हा कपडा गुजरातमध्ये मोंदीच्या नेहमीच्या टेलरकडे पाठवून त्याचे जॅकेट शिवण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.