यमुनेच्या पाण्यावरून PM Narendra Modi यांनी केजरीवाल यांच्यावर साधला निशाणा;  म्हणाले, यमुनेत विष… 

64
दिल्ली विधानसभा (Delhi Assembly Election 2025) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय वातावरण तापले आहे. बुधवार २९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील करतार नगर (Kartar Nagar) भागात जनतेला संबोधित केले. यावेळी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील (Haryana) भाजपाचे लोक यमुनेच्या पाण्यात विष (Yamuna River) मिसळून ते दिल्लीला पाठवत असल्याचा आरोप केला होता. यावर पीएम मोदींनी अरविंद केजरीवाल यांच्या हरियाणाबाबत केलेल्या वक्तव्याला चोख प्रत्युत्तर दिले. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Maha Kumbh stampede: प्रयागराज महाकुंभ दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी केली ‘एक्स’ पोस्ट, रेल्वेमंत्र्यांशीही बोलले)

करतार नगर (Kartar Nagar) येथील संकल्प सभेला बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, यमुनेच्या पाण्यावरून आम आदमी पक्षाच्या सरकारला धारेवर धरले. यमुनेत विष मिसळल्याच्या दाव्याला हरियाणाचा अपमान असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदी म्हणाले की, मीही तेच पाणी पितो, न्यायाधीश आणि परदेशी राजदूतही तेच पाणी पितात, त्यांना मारण्यासाठी विष मिसळले जाईल का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.

केवळ हरियाणाच नाही तर संपूर्ण देशाचा अपमान – पंतप्रधान मोदी

आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत पीएम मोदी म्हणाले, “चुका माफ करणे हे देशवासीयांचे उदार स्वभाव आहे. पण जर कोणी जाणूनबुजून चूक केली तर देश त्याला माफ करत नाही. हरियाणातील लोक देशभक्त आणि धार्मिक आहेत. हा देशाचा अपमान आहे, दिल्ली या लोकांना धडा शिकवेल. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – assistant loco pilot ला किती असते salary आणि काय असते जबाबदारी?)

काय म्हणाले केजरीवाल?

पीटीआयच्या वृत्तानुसार, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला होता की, भाजपा ‘घाणेरडे राजकारण’ करून दिल्लीतील जनतेला तहानलेले ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले होते- “हरियाणातील भाजपाचे लोक पाण्यात विष मिसळून दिल्लीला पाठवत आहेत. दिल्लीतील लोकांनी हे पाणी प्यायले तर अनेक लोक मरतील. यापेक्षा घृणास्पद काही असू शकते का?” केजरीवाल यांच्या या आरोपावर हरियाणा सरकारने गुन्हा दाखल करण्याची चर्चा केली होती. त्याच वेळी, निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांना हरियाणाच्या यमुना नदीच्या पाण्यात विष मिसळल्याच्या दाव्याच्या समर्थनार्थ पुरावे सादर करण्यास सांगितले होते.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.