PM Narendra Modi : ‘देश मणिपूरमधील नागरिकांच्या पाठीशी उभा, शांततेतून तोडगा काढला जाईल’ – पंतप्रधान मोदींनी दिले आश्वासन

लाल किल्ल्यावरून सलग १०व्यांदा पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले

140
PM Narendra Modi : 'देश मणिपूरमधील नागरिकांच्या पाठीशी उभा, शांततेतून तोडगा काढला जाईल' - पंतप्रधान मोदींनी दिले आश्वासन

देश आज ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा (PM Narendra Modi) करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १०व्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. यावेळी २१ तोफांची सलामी देण्यात आली.

पंतप्रधान मोदी यांनी पहाटेच सोशल मीडियावरून देशवासीयांना सोशल मीडियाच्या (PM Narendra Modi) माध्यमातून शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी लिहिले- “तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या अनेक शुभेच्छा. या, या ऐतिहासिक प्रसंगी अमृतकालमध्ये विकसित भारताचा संकल्प दृढ करूया. जय हिंद!”

‘देश पहले, हमेशा पहले’ (राष्ट्र प्रथम, नेहमीच प्रथम) ही यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाची (PM Narendra Modi) थीम आहे. लाल किल्ल्यावर सुरक्षेसाठी १० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.

(हेही वाचा – Independence Day 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून १०व्यांदा फडकावला तिरंगा)

यावेळी लाल किल्ल्यावरून सलग १०व्यांदा पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून आत्मनिर्भर भारत, मणिपूर, शेतकरी, शेजारी राष्ट्रांबद्दलचं धोरण यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी?

देश मणिपूरमधील नागरिकांच्या पाठीशी उभा – पंतप्रधान

“देश मणिपूरमधील नागरिकांच्या (PM Narendra Modi) पाठीशी उभा आहे. देश मणिपूरसोबत आहेत. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढला जाईल. मणिपूरमध्ये केंद्र आणि राज्य सरकार शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि यापुढे देखील करत राहील. शांततेतूनच मार्ग शोधला जाऊ शकतो.”

भारताची ताकद पाहून जग आश्चर्यचकित होत आहे

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) पुढे बोलतांना म्हणाले की, “आपण जो काही निर्णय घेऊ त्यावर पुढील हजार वर्षांसाठीची आपली दिशा ठरवणार आहे. मी देशाच्या सुपुत्रांना सांगू इच्छितो की, आज जे भाग्य लाभले आहे, ते क्वचितच कोणाच्या नशिबी आले आहे. चुकवू नका. माझा युवाशक्तीवर विश्वास आहे. आज माझ्या तरुणांनी जगातील पहिल्या तीन स्टार्टअप इकोसिस्टममध्ये स्थान दिले आहे. भारताची ही ताकद पाहून जग आश्चर्यचकित होत आहे. देशातील छोट्या शहरातील तरुणही नाव कमवत आहेत. यातून देशाची क्षमता दिसून येत आहे.

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) पुढे म्हणाले की, “भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या सर्व वीरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. आज आपल्याकडे लोकसंख्या, लोकशाही आणि विविधता आहे – या तिघांमध्ये राष्ट्राची स्वप्ने साकार करण्याची क्षमता आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.