PM Narendra Modi : रोजगार वाढवणे हे सरकारचे सर्वोच्च उद्दिष्ट

देशात पायाभूत सुविधांचे प्रकल्प कधी नव्हे ते इतक्या वेगाने उभे आहेत. प्रत्येक क्षेत्रात १० वर्षांपूर्वी आपण जशी प्रगती करत होतो त्यापेक्षा कित्येक पटींनी चांगली कामगिरी आपण आत्ता करत आहोत.

163
Prime Minister Modi : वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी करणार तामिळनाडू, लक्षद्वीप, केरळचा दौरा

गेल्या काही दिवसांपासून विरोधक सतत देशातील वाढती बेरोजगारी आणि गरीबी या मुद्द्यावरून सरकारला प्रश्न विचारत आहे. अशातच आता (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः विरोधकांच्या या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी यावर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

आपण (PM Narendra Modi) थोडा वेळ बेरोजगारी आणि महागाईवर होणारे आरोप बाजूला ठेवूयात आणि तथ्यांवर बोलूया. या काळात न भूतो न भविष्यती असं कोरोनाचे संकट आपल्यावर आले. त्यामुळे जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्थेची साखळी विस्कळीत झाली. अनेक देशांमध्ये मंदी सुरू होती. मात्र तरीही भारताने या संकटाशी दोन हात केले आणि आपली पत राखली. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Railway Traffic Affected By Fog : धुक्यामुळे रेल्वे वाहतूक प्रभावित; दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट)

२०१४ – १५ ते २०२३ नोव्हेंबर पर्यंत सरासरी महागाई केवळ ५.१ % –

पुढे बोलताना मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, “जागतिक प्रमुख अडथळे, जागतिक संकटे, तुटलेली पुरवठा साखळी आणि भू-राजकीय संघर्ष या सर्वांचा जगभरातील किंमतींवर परिणाम झाला, असा दावा त्यांनी केला. तसेच २००४ ते १४ या दहा वर्षांमध्ये महागाईचा सरासरी दर ८.२ % होता तर २०१४ – १५ ते २०२३ नोव्हेंबर पर्यंत सरासरी महागाई केवळ ५.१ % होती. मग यापैकी कोणता महागाईचा दर जास्त आहे?” असा प्रश्न देखील पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी विचारला.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : अयोध्येला ‘या’ तीन शहरांमधून आता थेट विमानसेवा; एअर इंडिया एक्सप्रेसची घोषणा)

रोजगार वाढवणे हे सरकारचे सर्वोच्च उद्दिष्ट –

देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, रोजगार वाढवणे हे त्यांच्या सरकारचे सर्वोच्च उद्दिष्ट आहे. यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी आकडेवारीचा वापर केला आहे. देशात पायाभूत सुविधांचे प्रकल्प कधी नव्हे ते इतक्या वेगाने उभे आहेत. प्रत्येक क्षेत्रात १० वर्षांपूर्वी आपण जशी प्रगती करत होतो त्यापेक्षा कित्येक पटींनी चांगली कामगिरी आपण आत्ता करत आहोत. ” असे देखील पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.