पुणेरी, फुलेंनंतर आता संत तुकारामाची पगडी! पंतप्रधान वारकरी संप्रदायाचा करणार सन्मान

111

महाराष्ट्राची संस्कृती वैविध्यतेने नटलेली आहे. त्यामुळे या संस्कृतीची अनेक प्रतीके निर्माण झाली आहे. पगडी हे त्यातील काहींचे प्रतीक आहे. जशी पुणेरी पगडी ही पेशव्यांची संस्कृती दर्शवते, महात्मा फुले यांची पगडी कष्टकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करते, तसे येत्या १४ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी संतशिरोमणी तुकाराम महाराजांची पगडी परिधान करून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायांचा सन्मान करणार आहेत. यानिमित्ताने राज्याच्या समाजकारणात आणखी एक पगडी चर्चेत येणार आहे.

अशी आहे संत तुकारामांची पगडी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा १४ जून रोजी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर देहू संस्थान आणि पोलीस विभागामार्फत जय्यत तयारी करण्यात आले आहे. त्याच दरम्यान देहू संस्थानकडून पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांना तुकोबांची पगडी आणि उपरणे तयार करण्यास सांगितले आहे. ही पगडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १४ जून रोजीच्या कार्यक्रमामध्ये भेट देण्यात येणार आहे. या पगडीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. मागील तीन-चार दिवसापासून पगडी आणि उपरणे तयार करण्यात येत आहे. पुढील काही तासात ते काम पूर्ण होईल. या पगडीचे आणि उपरण याच वैशिष्ट म्हणजे याला वेगळे कापड वापरले गेले आहे. पगडीच्यावरील बाजूस तुळशीची माळ, चिपळी, टाळ आणि पगडीच्या एका बाजूला जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांची छोटीशी प्रतिमा लावली आहे.

(हेही वाचा मविआच्या दोन मतांवर भाजपचा आक्षेप, निवडणूक आयोगाचे म्हणणे काय?)

पवारांमुळे फुले पगडी चर्चेत 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापनदिनी यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फक्त फुले पगडी घातली जाईल, अशी घोषणा २०१८ साली केली होती. पवारांनी नेत्यांकरवी फुले पगडी आणण्याचे आदेश दिले. सहकारनगर परिसरातून थेट लक्ष्मी रस्त्यावर कार्यकर्त्यांना पाठविण्यात आले. शरद पवार यांचे भाषण सुरू झाल्यावर हा कार्यकर्ता पोहोचला. पवार यांनी पुणे शहराध्यक्ष वंदना चव्हाण आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना बोलावून घेऊन फुले पगडी घालायला लावली. मात्र त्यानंतर वाद पेटला होता. पवारांन जाणीवपूर्वक पुणेरी पगडी नाकारली आहे, अशी टीका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले होते, तेव्हापासून फुलेंची पगडी चर्चेत आली.

पुणेरी पगडी पुणेरी संस्कृती 

पुणेरी पगडी ही पेशव्यांची पगडी म्हणून सर्वश्रुत आहे. आजपर्यंत या पगडीचा मानसन्मान करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, कृष्णशास्त्री चिपळूणकर, आगरकर आदी दिग्गज या पगडीचा सन्मान करत असत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.