Special Coin: पंतप्रधान मोदी जारी करणार नाण्यांची नवी सिरीज, ‘ही’ आहेत वैशिष्ट्य

133

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, सोमवारी वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आयकॉनिक वीक समारंभाचे उद्घाटन करणार आहे. यावेळी मोदी 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 आणि 20 रुपयांच्या नाण्यांच्या विशेष मालिका जारी करणार आहेत. ही नाण्यांची विशेष मालिका काही व्यक्तींसाठी खास असणार असल्याची माहिती पीएमओने दिली आहे.

काय म्हणाले पीएमओ 

पीएमओने एक निवेदन जारी केले आहे, त्यामध्ये असे म्हटले की, पंतप्रधान 6 जून 2022 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आयकॉनिक वीक समारंभाचे उद्घाटन करतील, म्हणजेच आज सकाळी 10.30 वाजता. “पंतप्रधान 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 आणि 20 रुपयांच्या नाण्यांची विशेष मालिका देखील जारी करतील,” असे त्यात म्हटले आहे. यासह नाण्यांची ही विशेष मालिका दृष्टिहीन व्यक्तींसाठी फायदेशीर ठरणार असून त्यांना ही नाणी सहज ओळखणं शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान; काँग्रेसने व्यक्त केला संताप)

नाण्यांची ‘ही’ आहेत वैशिष्ट्य

या नाण्यांच्या विशेष मालिकेअंतर्गत या नाण्यांवर ‘आझादी का अमृत महोत्सव’ AKAM चा लोगो असेल. पीएमओच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘नाण्यांच्या या विशेष मालिकांमध्ये AKAM च्या लोगोची थीम असेल. यामुळे दृष्टिहीन व्यक्तींना देखील सहज ओळखता येणार आहे. त्यामुळे ही नाण्यांची खास वैशिष्ट्य असल्याचे म्हटले जात आहे. हा आठवडा 6 ते 11 जून 2022 या कालावधीत ‘आझादी का अमृत महोत्सव’ (AKAM) चा भाग म्हणून साजरा केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.