PM Narendra Modi जाणार १२, १३ फेब्रुवारीला अमेरिका दौऱ्यावर

या दौऱ्यात पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) हे अमेरिकेत जाण्यापूर्वी फ्रान्सला भेट देतील.

43

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता येताच त्यांनी देशातील अवैध राहणाऱ्या परदेशी नागरिकांना देशाबाहेर काढण्याचा आदेश काढला आहे. त्यानुसार नुकतेच १०४ भारतीयांना अमेरिकेन सैन्याच्या विमानातून भारतात आणले. त्यांचे पडसाद देशाच्या संसदेत उमटले. विरोधकांनी पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) लक्ष्य केले. आता मोदी १२ आणि १३ फेब्रुवारी हे दोन दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी याविषयावर ते काय बोलतील यावर आता उत्सुकता लागली आहे.

या दौऱ्यात पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) हे अमेरिकेत जाण्यापूर्वी फ्रान्सला भेट देतील. पंतप्रधान मोदी १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सच्या दौऱ्यावर असतील. ते येथे होणाऱ्या एआय शिखर परिषदेचे सह-अध्यक्ष असतील. अमेरिकेचे उपराष्ट्रपती आणि चीनचे उपपंतप्रधान यांच्यासह इतर वरिष्ठ नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पॅरिसला पोहोचतील. फ्रान्स दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या रात्रीच्या जेवणाला उपस्थित राहतील. पंतप्रधान मोदी येथून थेट अमेरिकेला रवाना होतील.

(हेही वाचा Veer Savarkar International Airport : अंदमानच्या पर्यटनाला नवीन आयाम देणारं पोर्ट ब्लेअरचं वीर सावरकर आंतरारष्ट्रीय विमानतळ)

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याबद्दल सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) आमंत्रण पाठवले आहे. ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान मोदी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी अमेरिकेत असतील. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.