पंतप्रधान मोदी मणिपूरसह त्रिपूरा दौऱ्यावर, 22 प्रकल्पांसह टर्मिनल भवनाचे करणार उद्घाटन

69

मणिपूर हे म्यानमारच्या सीमेला लागून असलेले एक संवेदनशील भारतीय राज्य आहे, जिथे येत्या अडीच महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. मोदींचा हा दौरा आगामी त्रिपुरा आणि मनिपुरच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फार महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर आणि त्रिपुराच्या दौऱ्यावर असून येथे भेट देणार आहेत.

(हेही वाचा – ‘बुली बाई’ अॅप प्रकरणी पहिला आरोपी ताब्यात, मुंबई पोलीस सायबर सेलची कारवाई)

4800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 22 विकास प्रकल्पांचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी 5 राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या-त्या राज्यांत भेट देत आहेत. पंतप्रधान आज इंफाळमध्ये 4800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 22 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहे. याशिवाय पंतप्रधान आगरतळा येथील महाराजा बीर बिक्रम विमानतळावर बांधलेल्या नवीन टर्मिनलचे उद्घाटनही करतील. आठवड्याभरापूर्वी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही मणिपूरला दाखल झालेहोते. येथे त्यांनी ककचिंग येथील युवा रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावरही जोरदार निशाणा साधला. इतर राजकीय पक्षांना ना दिशा आहे ना दूरदृष्टी. ते फक्त भाजप आणि नरेंद्र मोदींवर टीका करतात, असे जे पी नड्डा यांनी म्हटले.

नड्डांच्या निशाण्यावर काँग्रेस

रॅलीला संबोधित करताना भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले, “इतर राजकीय पक्षांचा हेतू फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याचा आहे. ते हे विसरतात की पंतप्रधान मोदींवर टीका करताना ते देशावरही टीका करू लागतात. ते फक्त देशावर टीका करत आहेत. काँग्रेसचे लोकं फक्त भ्रष्टाचार आणि कमिशनबाबत विचार करत असतात. दुसरीकडे भारताला पुढे नेण्याचे आमचे व्हिजन आहे. भाजप सर्वांना बरोबर घेऊन चालते, पण ते घराणेशाही आणि परिवारवाद घेऊन चालतात, असे म्हणत जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.