Parliament Winter Session: अधिवेशन फलदायी ठरण्यासाठी, तरुण खासदारांना संधी द्यावी; पंतप्रधान मोदींचे आवाहन

127

संसदेचे हिवाळी अधिवेशन फलदायी असावे. नुकतीच झालेली सर्वपक्षीय सदस्यांच्या नेत्यांशी चर्चा फलदायी खूप सकारात्मक होती आणि आगामी काळात दोन्ही सभागृहात त्याचे प्रतिबिंब दिसेल, अशी आशा व्यक्त करत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या पूर्वी माध्यमांशी संवाद साधला. नवीन आणि तरुण खासदार यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि लोकशाहीच्या भावी पिढीला तयार करण्यासाठी, तसेच त्यांच्या सहभागासाठी त्यांना अधिकाधिक संधी द्यावी आणि चर्चा वाढवावी, असे नरेंद्र मोदींनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि सर्व स्तरावरील नेत्यांना आवाहन केले.

(हेही वाचा- ‘तोंड आवरा, पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये’, शिंदे गटातील ‘या’ मंत्र्याचा राऊतांना थेट इशारा)

पुढे ते असेही म्हणाले, सध्याच्या जागतिक परिस्थितीत देशाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आणि देशाला पुढे नेण्याच्या नव्या संधी लक्षात घेऊन या अधिवेशनात महत्त्वाचे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मला विश्वास आहे की, सर्व पक्ष चर्चेत मोलाची भर घालतील. संसदेचे हिवाळी अधिवेशन अधिक फलदायी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन मोदींनी केले आहे. गेल्या काही दिवसांत जेव्हा मी अनौपचारिक पद्धतीने सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांना भेटलो तेव्हा ते म्हणाले की, जेव्हा सभागृहात गदारोळ होतो आणि ते तहकूब होते, तेव्हा त्याचा परिणाम खासदारांवर होतो. युवा खासदारांचे म्हणणे आहे की, जेव्हा कार्यवाही होत नाही आणि चर्चा होत नाही, तेव्हा ते शिकण्यापासून आणि समजून घेण्यापासून वंचित राहतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज, प्रथमच, आमचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड राज्यसभेचे सभापती म्हणून पदभार स्वीकारत त्यांचा कार्यकाळ सुरू करणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाचा गौरव वाढविला त्याच प्रमाने शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जगदीप धनकड उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती या नात्याने भारताला अभिमान वाटावा, यासाठी मोठी भूमिका बजावली, याचा भारताला अभिमान वाटेल. ते खासदारांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देतील.

यावेळी संसद भवन परिसरात संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी, डॉ जितेंद्र सिंह, संसदीय कामकाज आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि संसदीय व्यवहार आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन देखील उपस्थित होते. यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर पासून 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या 23 दिवसांच्या कालावधीत एकूण 17 सत्रे आयोजित केली जातील. तर या अधिवेशनादरम्यान मांडण्यासाठी 25 विधेयके सध्या निश्चित करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.