PM Narendra Modi व डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा ; भेटीत नेमकं काय घडलं ?

99
PM Narendra Modi व डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा ; भेटीत नेमकं काय घडलं ?
PM Narendra Modi व डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा ; भेटीत नेमकं काय घडलं ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या अमेरिका दौऱ्यावर (US Visit) आहेत. या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोघांनी नियोजित कार्यक्रमानुसार संयुक्त पत्रकार परिषददेखील घेतली. या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत. ते एक महान नेते आहेत,” अशा शब्दात ट्रम्प यांनी मोदींचे कौतुक केले. तसेच, भारत (India) आणि अमेरिका नेहमीच मित्र बनून राहतील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. (PM Narendra Modi)

यावेळी, आपण भारतासोबत कठोर होऊन चीनला (China) कशी मात देणार? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता, ट्रम्प म्हणाले, “आम्ही कुणालाही मात देऊ शकतो. मात्र, आम्ही कुणालाही मात देण्याचा विचार तर नाही. आम्ही 4 वर्षे चांगले काम करत होतो. मात्र आम्हाला रोखले गेले आणि एक अत्यंत खराब प्रशासन आले. आता आम्ही पुन्हा चागले काम सुरू ठेऊ आम्ही मजबूत होऊ.” (PM Narendra Modi)

‘एक और एक 11’…!”
“भारत आणि अमेरिकेच्या भागिदारीने मानवतेला मोठा लाभ होईल. ट्रम्प आम्हाला मेक अमेरिका ग्रेट अगेनची (Make America Great Again) आठवण करून देतात. याच पद्धतीने 2047 पर्यंत भारताला एक विकसित देश बनवणे 1.4 अब्ज भारतीयांची आकांक्षा आणि संकल्प आहे. आपल्या भेटीचा अर्थ ‘एक और एक 11’ आहे. जो मानवतेसाठी एकत्रितपणे काम करेल,” असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. (PM Narendra Modi)

कुटुंबीयांसह मस्क यांची भेट
यावेळी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) यांनी आपल्या कुटंबासह भेट घेतली. ते आपल्या मुलांच्या हातात हात टाकून पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी आले होते. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचे अत्यंत निकटवर्ती नेते विवेक रामास्वामी देखील पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी आले होते. (PM Narendra Modi)

मस्क यांच्या भेटीनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट करत पंतप्रधान मोदी म्हणाले, “वॉशिंगटन डीसीमध्ये इलॉन मस्क यांच्यासोबत चांगल्या प्रकारे बैठक पार पडली. आमच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यात मस्क यांच्या आवडीच्या, स्पेस, मोबिलिटी, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन आदी मुद्द्यांचा समावेश होता. याशिवाय मी सुधारणा आणि ‘किमान सरकार, कमाल प्रशासना’च्या दिशेने भारताच्या प्रयत्नांवरही चर्चा केली.” (PM Narendra Modi)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.