मुंबईत मोदीच! शिंदे-फडणवीसांचे शक्तीप्रदर्शन

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यानंतर प्रथमच मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली जाहीर सभा होत आहे. बीकेसीवर अक्षरशः लोकांचा जथ्या जमा होत आहे. जागोजागी पंतप्रधान मोदी यांचे २०-२५ फुटांचे कट आऊट हे लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ढोल ताशाच्या गजरात लोक सभास्थळी येत आहेत. त्यामुळे मुंबईत मोदीच, असा संदेश एक प्रकारे भाजपने दिला आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारचे हे शक्ती प्रदर्शन आहे, असे दिसते.

बीकेसीत उत्सवी वातावरण

बीकेसीत प्रत्येक जण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी जमले आहेत. या ठिकाणी लोक ढोल ताशे वाजवत येत आहेत, तर काही जण लेझीम पथक घेऊन येत आहेत. तर काही जण शंख फुंकत, तुतारी वाजवत येत आहेत. लोकांमध्ये प्रचंड उत्साह वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईसाठी मोठ्या प्रकल्पांची घोषणा करणार आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी सभास्थळी काय संवाद साधणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान मोदी यांची ही सभा मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात असेल, असे जाणकारांचे मत आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

(हेही वाचा शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचे कौतुक करणा-या जाहिराती ‘सामना’त)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here