मुंबईच्या विकासासाठीचा पैसा बँकेत पडून; पंतप्रधान मोदींचा घणाघात

मुंबईतील विकासाचे प्रकल्प तेव्हाच वेग धरतील, जोवर स्थानिक सरकार समविचारी येत नाही. त्यासाठी स्थानिक महापालिकेवर समविचारी सरकार आणा. मुंबईचे पैसे बँकेच्या तिजोरीत पडून राहत असतील आणि विकासाला रोखण्याची प्रवृत्ती असेल तर विकास कसा होईल? हे शहर विकासासाठी तडफडत राहणे हे २१व्या शतकात कधीच स्वीकाहार्य नाही. भाजपचे सरकार असो, एनडीएचे सरकार असो विकासाच्या राजकरणात कधी अडथळा आणला नाही. पण याआधी मुंबईत असे अनेकदा होताना दिसले. पंतप्रधान स्वनिधी योजनेविषयी तसा अनुभव आला आहे. छोट्या व्यापाऱ्यांसाठी आम्ही आर्थिक मदत देऊ केली. ५ लाख जणांना पैसे दिले आहेत, हे आधीच काम झाले पाहिजे होते; पण आधीच्या सरकारने यात अडथळा आणला आणि त्याचे नुकसान सामान्य लोकांना सहन करावे लागले. त्यामुळे मुंबईपासून दिल्लीपर्यंत समविचारी सरकार असायला हवे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. मुंबईच्या विकासासाठीच्या ३८ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे शिलान्यास आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम गुरूवारी संपन्न झाला. बीकेसी येथे आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते.

(हेही वाचा विकासकामांमुळे अनेकांना पोटदुखी, मळमळ अन् धडकी भरली; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा)

आधी गरिबांच्या कल्याणाचा पैसा घोटाळ्यात जायचा!

मुंबईसाठी आवश्यक मेट्रो, सीएसएमटीचा पुनर्विकास, रस्ते हे सर्व प्रकल्प मुंबईचा विकास करतील. स्वातंत्र्यानंतर प्रथमच आज भारत मोठी स्वप्ने बघणे आणि ती पूर्ण करण्याचे धाडस करत आहे अथवा मागील अनेक वर्षे आपण गरिबीच्या गोष्टी करत राहणे आणि जगाकडून मदत मागणे हेच करत होतो. आता जगाला भारताच्या मोठ्या संकल्पावर विश्वास निर्माण झाला आहे. भारताबाबत जगात सकारात्मकता वाढली आहे. कारण भारत स्वतःच्या सामर्थ्याचा उत्तमप्रकारे सदुपयोग करत आहे. भारत समृद्धीसाठी जे करत आहे ते आवश्यक आहे. अभूतपूर्व आत्मविश्वास भारत अनुभवत आहे, आम्ही ती वेळ पहिली आहे कि गरिबांच्या कल्याणासाठीचे पैसे घोटाळ्यातून गायब व्हायचे याचे नुकसान भारताने पहिले आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला.

(हेही वाचा २५ वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्यांनी स्वतःची घरे भरली; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here