पंतप्रधानांचा देहू दौरा! आधी ‘नाठाळाचे माथी…’ आता ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म…’

118
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी, १४ जून रोजी देहू येथे येणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींच्या शुभहस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देहू संस्थान आणि पोलीस विभागामार्फत जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्याच दरम्यान देहू संस्थानकडून पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांना तुकोबांची पगडी आणि उपरणे तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार तुकाराम पगडी तयार करण्यात आली. मात्र, त्या पगडीवर समोरच्या बाजूला मध्यभागी लिहिण्यात आलेली ओवी आता बदलण्यात आली आहे.

ओवी का बदलली? 

आधी या पगडीवर ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी ॥ ही तुकाराम महाराजांची ओवी लिहिण्यात आली होती. आता या पगडीवरील ओवी बदलण्यात आली असून त्यावर ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ ही ओवी लिहिण्यात आली आहे. आता हीच पगडी उद्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात येणार आहे. या पगडीवरील ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’, या पगडीवरील ओव्या कोणत्या कारणास्तव बदलण्यात आल्या, यावर आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.