पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बुधवारी (२१ ऑगस्ट) रोजी दोन दिवसांच्या पोलंड आणि युक्रेन (Ukraine Poland PM Modi Visit) दौऱ्यावर रवाना झाले आहेत. दरम्यान या दौऱ्यावेळी एका विशेष ट्रेनद्वारे सुमारे दहा तासांच्या प्रवासानंतर ते राजधानी कीवमध्ये दाखल झाले. स्टेशनवर अनेक भारतीयांनी पीएम मोदींचे जंगी स्वागत केले. यानंतर त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की (President of Ukraine Volodymyr Zelensky) यांची भेट घेतली. या भेटीचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात पीएम मोदी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या खांद्यावर हात ठेवून चर्चा करताना दिसत आहेत.
#WATCH | PM @narendramodi and Ukrainian President @ZelenskyyUa honour the memory of children at the Martyrologist Exposition in #Kyiv@PMOIndia #PMModiInUkraine #Ukraine pic.twitter.com/tcVRIAcRyJ
— DD News (@DDNewslive) August 23, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात पीएम मोदी (PM Narendra Modi) सात तास युक्रेन देशात राहतील आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी रशिया-युक्रेन युद्धासह विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या मारिन्स्की पॅलेसमध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची अधिकृत चर्चा होईल. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मारिन्स्की पॅलेस पूर्णपणे सजवण्यात आला आहे.
(हेही वाचा – Chief Secretary : चहल यांची मुख्य सचिव पदाच्या दिशेने वाटचाल)
पीएम मोदी आणि झेलेन्स्की यांची चौथी भेट
भारतीय पंतप्रधानांनी युक्रेनला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. कीव आणि नवी दिल्ली यांच्यातील राजनैतिक संबंध ३० वर्षांपूर्वी, म्हणजे १९९४ मध्ये प्रस्थापित झाले. तसेच, पीएम मोदी (PM Narendra Modi) आणि झेलेन्स्की यांची ही चौथी भेट आहे. मोदी आणि झेलेन्स्की यांची पहिली भेट नोव्हेंबर २०२१ मध्ये ग्लासगो, स्कॉटलंड येथे झाली होती. त्यावेळी ग्लासगो येथे संयुक्त राष्ट्रांची COP26 हवामान परिषद भरली होती. या परिषदेत दोन्ही नेत्यांची भेट झाली. यानंतर, दुसरी भेट २०२३ मध्ये जपानच्या हिरोशिमा येथे G7 शिखर परिषदेत (G7 Summit) झाली. तिसरी भेट १४ जून २०२४ रोजी इटलीमध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेत झाली होती.
हेही पाहा –