राज्यात सरकार स्थापनेसाठी मोदींनीही दिलेली ऑफर! शरद पवारांचा गौप्यस्फोट

121

आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करावे, अशी ऑफर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिली होती. मात्र आमची विचारधारा वेगळी असल्याने हे शक्य होणार नाही, तसे आपण पंतप्रधानांना त्यांच्या कार्यालयात जाऊन सांगितले होते. परंतू तरीही पंतप्रधान मोदींनी ‘तरीही तुम्ही यावर विचार करा’, असे म्हणाले. राज्यात आमचेही (काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस) काही जमत नव्हते. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीला बरोबर घ्यावे हा विचार भाजप नेतृत्वाच्या मनात आला असेल आणि त्यांनी चाचपून पाहिले असेल, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

भाजपच्या कृपेने राज्यातील सरकार

निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट बहुमत भाजप आणि शिवसेना युतीलाच होते. मात्र उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात नेतृत्वाविषयी जे ठरले होते ते पाळले न गेल्याने उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांच्यातील वाढलेली दरी आमच्यासाठी संधी होती, ती आम्ही साधली. त्यामुळे राज्यातील सरकार भाजपच्या कृपेने आहे. बाळासाहेब ठाकरे हे माझे मित्र असल्याने मी मित्राच्या मुलाच्या पाठीशी आहे, असेही शरद पवार म्हणाले.

(हेही वाचा गांधींविषयी आक्षेपार्ह विधान करणारे कालीचरण महाराजांना अटक)

…तर अजित पवारांनी सरकारच बनवले असते

राज्यात भाजपबरोबर अजित पवारांना शरद पवार यांनीच पाठवले, या चर्चेबाबत विचारले असता, ‘मी पाठवले असते तर अजित पवार यांनी सरकारच बनवले असते. असे अर्धवट काम केले नसते,’ असे उत्तर पवार यांनी दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.