G20 परिषदेसाठी आलेल्या विविध देशांच्या नेत्यांचे पंतप्रधानांनी केले स्वागत

161

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या G20 परिषदेसाठी येणाऱ्या नेत्यांचे हार्दिक स्वागत केले आहे.

मॉरिशसच्या पंतप्रधानांचे स्वागत करताना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे:

“माझे मित्र पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, भारतात आपले स्वागत आहे. आज होणाऱ्या आपल्या भेटीसाठी उत्सुक आहे.”

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालकांचे स्वागत करताना पंतप्रधानांनी ट्वीटर संदेशात म्हटले आहे:

“क्रिस्टालिना जॉर्जिवा, आपल्याशी पूर्णपणे सहमत आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या काळातील मोठी आव्हाने दूर करण्यासाठी काम करूया, आणि आजच्या युवा पिढीसाठी चांगले भविष्य सुनिश्चित करू या. नवी दिल्ली येथे आगमन झाल्यावर आमच्या संस्कृती प्रति आपण दाखवलेली आपुलकी प्रशंसनीय आहे.”

(हेही वाचा British Prime Minister Rishi Sunak : भारतात येताच ब्रिटनचे पंतप्रधान म्हणाले की मी हिंदु असल्याचा मला अभिमान वाटतो)

युरोपियन युनियन आयोगाच्या अध्यक्षांचे स्वागत करताना पंतप्रधानांनी ट्वीटर वर लिहिले आहे:

“उर्सुला वॉन डेर लेयन, G20 परिषदेसाठी आपण नवी दिल्ली येथे आलात, याबद्दल आनंद वाटतो. युरोपियन युनियनचा पाठींबा आणि वचनबद्धतेसाठी कृतज्ञ आहे. आपल्या पुढील गंभीर आव्हानांचा एकत्रितपणे सामना करूया. फलदायी विचारविनिमय आणि सहयोगी कृतीची आशा करतो.”

युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांचे स्वागत करताना पंतप्रधान मोदी यांनी ट्वीटर वर लिहिले आहे:

“ऋषी सुनक, आपले स्वागत आहे! आपल्या ग्रहाला अधिक चांगले बनवण्यासाठी एकत्र काम करता येईल, अशा फलदायी परिषदेसाठी उत्सुक आहे.”

स्पॅनिश प्रतिनिधी मंडळाचे स्वागत करताना, पंतप्रधानांनी ट्वीटरवर स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांना उद्देशून लिहिले आहे:

“पेड्रो सांचेझ, आपल्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होवो, आणि आपल्याला उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना. आगामी G20 परिषदेत ज्ञानात भर घालणाऱ्या आपल्या दृष्टीकोनाची कमतरता भासेल. भारतात आलेल्या स्पॅनिश प्रतिनिधी मंडळाचे स्नेहमय स्वागत करतो.”

(हेही वाचा G-20 Summit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे भारतात आगमन; जी-20 परिषदेसाठी जागतिक स्तरावरील नेते दिल्लीत )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.