देश आज ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा (PM Narendra Modi) करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १०व्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. त्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
देश नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे
“भारताच्या अमृत काळातील हे पहिले वर्ष आहे. या कालखंडामध्ये आपण जे काही करू, जी पाऊलं उचलू, जितका त्याग करू, जितकं परिश्रम करू, सर्वजनहिताय, सर्वजनसुखाय निर्णय घेऊ, येणाऱ्या १ हजार वर्षात देशाचा स्वर्निम इतिहास यामुळे अनुकूल होणार आहे. या कालखंडात घडणाऱ्या घटनांचा आगामी १ हजार वर्षासाठी प्रभाव पडणार आहे. गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडलेला देश पंचप्राण समर्पित करून नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
Addressing the nation on Independence Day. https://t.co/DGrFjG70pA
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2023
(हेही वाचा – PM Narendra Modi : ‘देश मणिपूरमधील नागरिकांच्या पाठीशी उभा, शांततेतून तोडगा काढला जाईल’ – पंतप्रधान मोदींनी दिले आश्वासन)
पुन्हा एकदा आपली भारत माता जागृत झाली आहे
पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) पुढे बोलतांना म्हणाले की, “नव्या संकल्पांना सिद्ध करण्यासाठी मनापासून लढत आहे. माझ्या भारत मातेत सर्व ऊर्जांचं सामर्थ्य आहे. १४० कोटी लोकांच्या ऊर्जेने, इच्छेने, चेतनेने पुन्हा एकदा आपली भारत माता जागृत झाली आहे. या कालखंडात गेल्या ९-१० वर्षांत आपण अनुभवलं की जगभरात भारताच्या चेतनेप्रती, सामर्थ्याप्रती नवं आकर्षण, नवा विश्वास, नवी आशा निर्माण झाली आहे. जगात एक नवा विश्वास निर्माण होतोय.”
“आपलं सौभाग्य आहे की आपल्या पूर्वजांनी आपल्याला काही गोष्टी दिल्या आहेत. आज आपल्याकडे लोकसंख्या, लोकशाही आणि विविधता आहे – या तिघांमध्ये भारताच्या प्रत्येक स्वप्नाला साकार करण्याचं सामर्थ्य आहे, असंही मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community