पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुण्यातील देहू येथे दौऱ्यावर येणार आहेत. या दरम्यान, एक नवा नियम समोर आला आहे. देहू येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात काळे कपडे करणाऱ्यास मज्जाव करण्यात आला आहे. जे लोकं काळे कपडे परिधान करून मोदींच्या कार्यक्रमात हजर राहतील त्यांना या कार्यक्रमात एन्ट्री नसणार असल्याचे सांगितले जात आहे.
काळे कपडे घातलेल्यांना प्रवेश नाही
काळ्या रंगाचे शर्ट, काळ्या रंगाच्या टोप्या, काळ्या रंगाचे मोजे यासह कोणतीही काळ्या रंगाची गोष्ट घालून येण्यास येथे मनाई असणार आहे. काळा शर्ट घालून आलेल्या व्यक्तीला या कार्यक्रमाच्या प्रवेशावर रोखण्यात आले आहे. यानंतर हा नियम येथे असल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या देहू येथील दौऱ्याच्या सभेच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. या पोलिसांकडूनच मोदींच्या कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. या तपासणीमध्ये काळा रंग देखील एक भाग आहे. ज्या लोकांना काळ्या रंगाचे कपडे घातले त्यांना प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा – पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे ‘हा’ वाहतूक मार्ग बंद; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर)
पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे मुंबईतील ‘हा’ वाहतूक मार्ग बंद
दरम्यान, पुण्यातील देहू येथील दौऱ्यानंतर दक्षिण मुंबईतील राजभवन आणि वांद्रे- कुर्ला संकुल येथे होणा-या कार्यक्रमास पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत.त्यामुळे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक पोलीस विभागाने वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत वांद्रे- कुर्ला संकुल परिसरातील काही भागांत प्रवेश बंदी केली आहे. तर, काही भागात पर्यायी मार्ग खुले करण्यात आले आहेत.