सध्या देशात वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) धावत आहेत. त्याला मोठा प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळेच विविध राज्ये आणि जिल्हे या गाडीची मागणी करत आहेत. त्यामुळे रविवार, २४ सप्टेंबर रोजी आणखी ९ वंदे भारत एक्सप्रेसच्या गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहे.
महाराष्ट्रात शिर्डी, सोलापूरसह गोव्यासाठीही काही महिन्यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली, आता कोल्हापूरसह अन्य काही शहरांनीही या गाड्यांची मागणी केली आहे. यामध्ये देशातील अनेक राज्ये आणि शहरांचा समावेश आहे. देशाला आणखी ९ सेमी-हाय स्पीड ट्रेनच्या रूपाने ९ वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) गाड्यांची भेट मिळेल. या गाड्या सुरू झाल्यामुळे देशातील अनेक राज्यांना नवीन आणि आधुनिक गाड्यांचा लाभ मिळणार आहे. राजस्थान, गुजरात, तेलंगणा, ओडिशा, केरळ तसेच पश्चिम बंगालमधील हावडा आणि तामिळनाडूमधील चेन्नई येथे प्रत्येकी २ ट्रेन जाणार आहेत.
यात रांची-हावडा, पाटणा-हावडा, विजयवाडा-चेन्नई, तिरुनेलवेली-चेन्नई, राउरकेला-पुरी, उदयपूर-जयपूर, कासारगोड-तिरुवनंतपुरम जामनगर-अहमदाबाद आणि हैदराबाद-बेंगळुरू. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मे २०२३ मध्ये वंदे भारत ट्रेन संदर्भात एक महत्वाची घोषणा केली होती. यामध्ये असे म्हटले होते की, फेब्रुवारी मार्च २०२४ पर्यंत देशात एकूण तीन प्रकारच्या वंदे भारत ट्रेन चालवल्या जातील.
(हेही वाचा Khalistani : खलिस्तानी दहशतवादी सुखा दुनिकेच्या हत्येची लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी)
Join Our WhatsApp Community